झी मीडियाचा दणका: ट्रान्झिट कॅम्पमधील रहिवाशांना मिळाला न्याय

Last Updated: Tuesday, October 1, 2013, 17:44

म्हाडाच्या ट्रान्झिट कॅम्पमधले रहिवासी अक्षरशः नरकयातना भोगत होते. जिथं दहा मिनिटं उभं राहिलं तरी जीव गुदमरतो तिथं गेली अनेक वर्षं दोनशे कुटुंब कसेबसे दिवस काढत आहेत. झी मीडियानं हाच मुद्दा लावून धरला आणि अखेर इथल्या रहिवाशांना न्याय मिळाला.