Last Updated: Thursday, June 6, 2013, 12:51
www.24taas.com, नवी दिल्ली, झी मीडियाराजस्थान रॉयल्सचा मालक राज कुंद्राच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. राज कुंद्रा स्वतः सट्टेबाजी करत असल्याची पोलीस सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे यासंदर्भात पुन्हा राज कुंद्राची चौकशी होऊ शकते.
दिल्ली पोलिसांनी राज कुंद्राचा पासपोर्ट जप्त केला असून त्याला विदेशात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. काल दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने तब्बल 12 तास कुंद्राची कसून चौकशी केली होती. मयप्पन आणि कुंद्रा यांच्यातील संभाषण पोलिसांच्या हाती लागल्याची चर्चा होती.
त्या पार्श्वभूमीवर कुंद्राच्या चौकशीला महत्त्व प्राप्त झालं होतं. आता तर कुंद्राचा सहभाग थेट सट्टेबाजीत असल्याचा संशय दिल्ली पोलिसांना आहे. त्यामुळे कुंद्राच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, June 6, 2013, 12:50