फिक्सिंग प्रकरणात शिल्पा शेट्टी मीडियावर भडकली, Shilpa Shetty grouch on media

फिक्सिंग प्रकरणात शिल्पा शेट्टी मीडियावर भडकली

फिक्सिंग प्रकरणात शिल्पा शेट्टी मीडियावर भडकली
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

पासपोर्ट जप्त केल्याची बातमी देणाऱ्या मीडियावर राज कुंद्रा आणि त्यांची पत्नी, अभिनेत्री शिल्पा शेट्टी चांगलेच भडकलेत. या दोघांनी ट्विटरवरून आपला राग व्यक्त केला आहे. दिल्ली पोलिसांना त्यांचं काम करू द्या. अविश्वनीय सूत्रांच्या आधारे बातम्या देऊ नका, असा सल्लाच कुंद्रा यांनी दिला आहे. तर कोणत्याही पुराव्याशिवाय राज कुंद्रांवर आरोप ठेवले जात असल्याची ओरड शिल्पानं केली आहे. पहा शिल्पा आणि राज कुंद्राचे ट्वीट....

शिल्पा आणि राजची टिवटिव :

शिल्पाचे ट्विट -

`स्टॉप प्रेस` करायला पाहिजे... हेडलाईन्स मिळविण्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. मी आणि माझ्या कुटुंबियांसाठी हे त्रासदायक होतंय... पुराव्याशिवाय अशा गोष्टी दाखवल्या जाणं धक्कादायक आहे. हे आम्ही सहन करू शकत नाही...

राज कुंद्राचे ट्विट -

`त्रासदायक विधानं थांबवा`
त्यांची सूत्र अविश्वासार्ह आहेत... दिल्ली पोलिसांनी अटक वॉरंट काढलंय का? मी माझ्या मुंबईच्या घरी परतही आलोय... दिल्ली क्राईम ब्रँचला त्यांचं काम करू द्या! त्रासदायक ठरणा-या बातम्या विनाकारण देणं बंद करा...


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, June 6, 2013, 13:32


comments powered by Disqus