Last Updated: Tuesday, May 28, 2013, 19:34
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्लीआयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी अटक केलेला श्रीसंत आणि चंदेलिया हे दोघे आमने-सामने आल्यावर काल चांगलीच जुंपली. स्पॉट फिक्सिंगप्रकरणात मला चंदेलियाने अडकवले असे श्रीसंत याने सांगितले. त्यामुळे तो समोर येताच शीघ्रकोपी श्रीसंत आपलं सतुलंन घालवून बसला. आणि चंदेलियावर हात उगारला.
यामुळे हे दोघे आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंगमध्ये अडकल्यानंतर व अटक झाल्यानंतरही वादाच्या केंद्रस्थानी कायम आहेत. या दोघांची भांडणे पाहताच पोलिसांनी हस्तक्षेप केला व दोघांना शांत केले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीसंत रविवारी चंदेलियाला तुरुंगातच भिडला. प्रथम दोघात बाचाबाची झाली. या बाचाबाची दरम्यान श्रीसंतने चंदेलियाला शिव्या घातल्याने त्याचा पारा चढला. यानंतर ही बाब हाणामारीपर्यंत गेली. या दोघांचा गोंधळ व आवाज ऐकून पोलिस तेथे पोहचले. त्यांनतर पोलिसांनी त्यात हस्तक्षेप करून दोघांना शांत केले.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Tuesday, May 28, 2013, 13:40