Last Updated: Monday, September 16, 2013, 20:29
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईलालबागच्या राजाच्या मंडपात घडणा-या एकेक घटना सातत्यानं समोर येतायत. काल रात्री एका महिला कॉन्स्टेबलला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचं आम्हाला समजलंय. यावर कोणीही पोलीस अधिकारी बोलायला तयार नाही. उलट वरिष्ठ अधिकारी हे प्रकरण दाबण्याच्या खटपटीत आहेत. या कॉन्स्टेबलचं नाव रूपा असल्याचं समजतंय. मात्र याबाबत पोलीस अधिकारी मूग गिळून गप्प बसले आहेत...
लालबागच्या कार्यकर्त्यांची ही मुजोरी नवी नाही. गेल्या वर्षी विसर्जन मिरवणुकीमध्ये एका कार्यकर्त्यानं महिला पोलिसाच्या कानफटात मारली होती. सीसीटीव्हीमध्ये हे दृष्य कैद झालंय. तेव्हाही वरिष्ठ अधिका-यांनी अशीच बोटचेपी भूमिका घेत हे प्रकरण दाबलं.
कार्यकर्त्यांना वेळीच वचक न घातल्यामुळे त्यांची भीड चेपलीये. त्यामुळेच काल रात्रीही कॉन्स्टेबलवर हात उगारण्याची कार्यकर्त्यांची हिम्मत झाली. अर्थात यावेळीही वरिष्ठ अधिकारी गप्पच आहेत...
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.