भाजपमध्ये गोंधळ, जसवंत सिंगांची जोरदार टीका

भाजपमध्ये गोंधळ, जसवंत सिंगांची जोरदार टीका
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

भाजपचे ज्येष्ठ नेते जसवंत सिंग राजस्थानमधल्या बारमेरमधून अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. उमेदवारी नाकारल्यानं पक्षावर नाराज असलेले जसवंत सिंग उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. `अँडजस्ट करुन घ्यायला मला काय फर्निचर समजताय का ?, अशा कडक शब्दात जसवंत सिंग यांनी आपला संताप व्यक्त केलाय.

जसवंत सिंग यांच्या जाहीर टीकेमुळे भाजपतील ज्येष्ट नेते आणि दुस-या फळीतील नेते यांच्यातील दुही चव्हाट्यावर आलीय. सुषमा स्वराज यांनीही जयवंत सिंग यांना उमेदवारी नाकल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. तर ज्येष्ट नेते लालकृष्ण अडवाणी यांना उमेदवारी घोषीत करण्यातही उशीर झालाय.

तसेच त्यांच्या मागणीनुसार भोपाळ मतदारसंघ मिळाला नाही. त्यामुळे अडवाणीही नाराज झाले होते. आता अडवाणींना अजून एक धक्का बसलाय. त्यांचे खंदे समर्थक समजले जाणारे हरीन पाठक यांना डावलण्यात आलंय. एकूणच भाजपमध्ये नमो नमोचा गजर होत असताना ज्येष्ठांकडे मात्र दुर्लक्ष होत आहे अशी चर्चा आहे.

दरम्यान, निवडणुकीचं तिकीट मिळालं नसल्यानं जसवंत सिंग नाराज असले तरी अपक्ष निवडणूक लढवणार नसल्याचा दावा गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी केलाय.. नितीन गडकरी यांच्या प्रचारासाठी मनोहर पर्रिकर नागपुरात आले होते.. येत्या निवडणूकीत भाजपचा विजय निश्चित असल्याने इच्छुकांची संख्या वाढलीय. त्यामुळं रुसवे फुगवे स्वाभाविक असल्याचंही पर्रिकरांनी म्हटलंय.

तर दुसरीकडे उमेदवारी नाकारलेले अहमदाबादचे भाजपचे विद्यमान खासदार हरेन पाठक यांनीही आपली नाराजी बोलून दाखवलीये. काँग्रेसमध्ये कमी महत्व असलेल्या नेते भाजपात दाखल होतात. आणि त्यांना उमेदवारी मिळते, असा टोला त्यांनी लगावलाय.

उमेदवारी नाकरल्या गेल्यानं दुखावलेले ज्येष्ठ भाजप नेते भाजप नेते जसवत सिंग बारमेरमधून अपक्ष म्हणून लढणार आहेत. भाजपकडून उमेदवारी नाकारल्यानंतर जसवत सिंह यांनी खरा भाजप आणि खोटा भाजप अशी वर्गवारी करण्याची वेळं आली असल्याचं परखड मतं व्यक्त केलं होतं.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, March 23, 2014, 20:17
First Published: Sunday, March 23, 2014, 20:29
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?