Last Updated: Sunday, March 23, 2014, 20:29
भाजपचे ज्येष्ठ नेते जसवंत सिंग राजस्थानमधल्या बारमेरमधून अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. उमेदवारी नाकारल्यानं पक्षावर नाराज असलेले जसवंत सिंह उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. `अँडजस्ट करुन घ्यायला मला काय फर्निचर समजताय का ?, अशा कडक शब्दात जसवंत सिंह यांनी आपला संताप व्यक्त केलाय.