Last Updated: Thursday, April 17, 2014, 14:06
पुण्याप्रमाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातही अनेक मतदारांची नावे मतदार यादीत नाहीत. रत्नागिरीत वर्षानुवर्ष मतदान करणा-या ज्येष्ठ नागरिकांचं नाव यादीत नव्हतं. त्यामुळे पुन्हा मतदार यादीतील गोंधळ पुढे आला आहे.
Last Updated: Sunday, March 23, 2014, 20:29
भाजपचे ज्येष्ठ नेते जसवंत सिंग राजस्थानमधल्या बारमेरमधून अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. उमेदवारी नाकारल्यानं पक्षावर नाराज असलेले जसवंत सिंह उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. `अँडजस्ट करुन घ्यायला मला काय फर्निचर समजताय का ?, अशा कडक शब्दात जसवंत सिंह यांनी आपला संताप व्यक्त केलाय.
Last Updated: Wednesday, January 22, 2014, 07:48
शीतल म्हात्रे प्रकरणी मुंबई महापालिकेत शिवसेनेची कोंडी विरोधकांनी केली. विरोधकांच्या गोंधळात सभागृह तिसर्यांदा गुंडाळले गेले. यावेळी विरोधकांनी गटनेत्यांच्या बैठकीवर बहिष्कार घातला. गोंधळ घातल्याने विरोधी पक्षाच्या पाच सदस्यांवर निलंबनाची कारवाई करीत महापौर सुनील प्रभू यांनी मनमानी कारभार सुरू ठेवला. तसा आरोप विरोधकांनी केलाय.
Last Updated: Friday, October 25, 2013, 20:01
महागाई, भ्रष्टाचार,शुद्ध पिण्याच्या पाण्याचा अभाव अशा विविध समस्यांनी सामान्य नागरिक हैराण आहेत. दैनंदिन जगण्यातल्या या कटकटी कमी झाल्या म्हणून की काय, बोरिवलीकरांच्या वाट्याला आणखी एक समस्या आलीय.
आणखी >>