मुख्यमंत्री बनण्याची मुंडेंची सुप्त इच्छा उघड!

मुख्यमंत्री बनण्याची मुंडेंची सुप्त इच्छा उघड!

www.24taas.com, झी मीडिया, पुणे

भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनायचं, हे आम्ही नाही तर खुद्द मुंडेंनी पुण्यातल्या सभेत म्हटलंय.

भाजपचे पुण्याचे उमेदवार विश्वजीत कदम यांच्या प्रचारासाठी गोपिनाथ मुंडे पुण्यात होते. त्यांनी यावेळी गोखले नगर आणि क्वार्टर गेट इथं दोन सभा घेतल्या. यावेळी, खासदार म्हणून निवडून येणार आणि सहा महिन्यांनी पुन्हा राज्यात येणार, अशी घोषणाही मुंडेंनी केलीय.

पुण्यातल्या क्वार्टर गेट इथल्या दुसऱ्या सभेत मुंडेंनी राज्य सरकारची संभावना `अलीबाबा चालीस चोर` अशी करत हल्लाबोल केला तर गोखले नगर इथल्या सभेत कलमाडी आणि पवारांना टीकेचं लक्ष केलं.

तसंच देशातल्या १०० स्मार्ट सिटी विकसित म्हणून करणार असून पुण्याचा त्यात समावेश असेल आणि मराठा समाजाला आरक्षण देऊ असं आश्वासनही मुंडेंनी दिलं.



व्हिडिओ पाहा -




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, April 11, 2014, 13:26
First Published: Friday, April 11, 2014, 13:26
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?