www.24taas.com, झी मीडिया, मुंबई लोकसभा निवडणुकीची रणधुमाळीचा अखेरचा टप्पा आज चांगलाच रंगला. अर्थातच, हा टप्पा आहे निकालाचा...
सायंकाळी ६.३० वाजता अपडेट Ø
रामटेक कृपाल तुमाने १ लाख ७५ हजार ७९ मतांनी विजयी
Ø
नागपूर नितीन गडकरी २ लाख ८४ हजार ८२८ मतांनी विजयी
Ø
चंद्रपूर २ लाख ३६ हजार २६९ मतांनी विजयी
Ø
गडचिरोली भाजपचे अशोक नेते २ लाख ३६ हजार ५४० मतांनी विजयी
सायंकाळी ६.०० वाजता अपडेट Ø १२ व्या फेरीपर्यंत २ लाख ६ हजार ४१६ मतांनी किरीट सोमय्या आघाडीवर
Ø नागपूर - १६ फेरीनंतर गडकरी २ लाख ८२ हजार १२४ मतांनी आघाडीवर
Ø चंद्रपूर - हंसराज अहिर २४व्या फेरीनंतर २ लाख ३३ हजार ८५८ मतांनी आघाडीवर
Ø
पालघर भाजपचे चिंतामण वनगा विजयी.... बळीराम जाधव यांच्यावर मात
Ø
हिंगोली राजीव सातव अवघ्या १६३२ मतांनी विजयी... महायुतीच्या सुभाष वानखेडे यांचा पराभव
सायंकाळी ५.३० वाजता अपडेट Ø चंद्रपूर - २३व्या फेरीनंतर हंसराज अहिर २,२८,१३६ मतांनी आघाडीवर
Ø नागपूर - नितीन गडकरी २ लाख ३३ हजार ८०० मतांनी आघाडीवर
Ø रामटेक - सोळाव्या फेरीनंतर कृपाल तुमाने १ लाख ४५ हजार १०८ मतांनी आघाडीवर
Ø शिर्डी - पंधराव्या फेरीनंतर सदाशिव लोखंडे ४,१६,३४० मतं तर भाऊसाहेब वाकचौरेंना २,६५,१२५ मतं
Ø
ठाणे राजन विचारे २ लाख ८० हजार ९४४ मतांनी विजयी
Ø
रत्नागिरी-सिंधुदुर्ग शिवसेनेचे विनायक राऊत यांचा १ लाख ५० हजार ५१ मतांनी विजय... निलेश राणेंचा केला पराभव
सायंकाळी ५.०० वाजता अपडेट Ø
पुणे अनिल शिरोळे ३ लाख १४ हजार ८७० मतांनी विजयी... विश्वजीत कदम यांना पछाडलं
Ø
अहमदनगर भाजपचे दिलीप गांधी २ लाख ८ हजार ४०७ मतांनी विजयी
Ø
चंद्रपूर हंसराज अहिर २ लाख ५ हजार ६ मतांनी आघाडीवर
Ø
परभणी शिवसेनेचे संजय जाधव १ लाख २७ हजार १५५ मतांनी विजयी
Ø
भंडारा-गोंदिया भाजपचे नाना पटोले विजयी, प्रफुल्ल पटेल यांचा पराभव 1,49, 722
Ø
वर्धा रामदास तडस २,१५,७८३ मतांनी विजयी
दुपारी ४.०० वाजता अपडेट Ø
रायगड शिवसेनेचे अनंत गीते यांना विजयी केलं घोषित... सुनील तटकरेंना पराभव मान्य
Ø
जालना भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे २ लाख १४ हजार मतांनी विजयी... काँग्रेसचे उमेदवार विलास औताडे पराभूत
Ø
कोल्हापूर राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक विजयी... मडाडिक यांना एकूण ६,७६,६६५ मतं तर सेनेच्या संजय मंडलिक यांना ५,७४,४०६ मतं...
Ø
सोलापूर शरद बनसोडे विजयी... सुशीलकुमार शिंदेंना पराभवाचा जबर धक्का
Ø
शिरुर शिवाजी आढळराव विजयी... देवदत्त निकम पराभूत
Ø
औरंगाबाद चंद्रकांत खैरे १ लाख २५ हजारपेक्षा जास्त मतांनी विजयी... सलग चौथ्यांदा खासदार होण्याचा पटकावला बहुमान
Ø
मावळ श्रीरंग बारणे १ लाख ५७ हजार ३९७ मतांजी विजयी... जगताप यांनी ३,५४८२९ मतं, तर नार्वेकरांना १,८२,२९३ मतं
Ø
माढा माढा लोकसभा मतदारसंघातून विजयसिंह मोहिते पाटील २९,००० मतांनी विजयी
Ø
अकोला संजय धोत्रे २ लाख ४ हजार ११६ मतांनी विजयी
Ø
नांदेड काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण यांना ८०,८३८ मतांचं मताधिक्य... भाजपच्या डी बी पाटील यांचा पराभव
दुपारी ३.०० वाजता अपडेट Ø
सांगली - भाजपचे संजय काका पाटील २ लाख ३८ हजार ९३२ मतांनी विजयी... सांगलीतल्या आत्तापर्यंतच्या सर्व लोकसभा निवडणुकीतलं मताधिक्य तोडलं
Ø
मुंबई उत्तर पश्चिम - गजानन किर्तीकर विजयी
Ø
उत्तर मध्य मुंबई - प्रिया दत्त यांचा पराभव करत पुनम महाजन विजयी
Ø
दक्षिण मुंबई - शिवसेनेचे अरविंद सावंत विजयी
Ø
बारामती - सुप्रीया सुळे यांचा ७०,००० मतांनी विजय
Ø
दक्षिण मध्य मुंबई राहुल शेवाळे यांची निर्णायक आघाडी, ४२,९५५ मतांची घेतली आघाडी
Ø
उत्तर मुंबई गोपाळ शेट्टी उत्तर मुंबईतून गोपाळ शेट्टी ४ लाख ४६ हजार ५८२ मतांनी विजयी, खासदार संजय निरुपम यांचा केला पराभव
दुपारी २.०० वाजता अपडेट Ø
रायगड - रायगडमधून शिवसेनेचे अनंत गिते विजयी....राष्ट्रवादीचे सुनील तटकरेंनी जोरदार दिली टक्कर , शेवटच्या फेरीपर्यंत चुरस
Ø
हातकणंगले - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राज् शेट्टी पुन्हा विजयी... १ लाख ७७ हजार मतांनी मिळवला विजय
Ø
सिंधुदुर्ग - विनायक राऊत विजयी
Ø
मावळ - श्रीरंग बारणे १ लाख ५७ हजार ३९७ मतांनी विजयी घोषित
Ø
भिवंडी - भाजपचे कपिल पाटील विजयी... काँग्रेसच्या विश्वनाथ पाटील यांचा केला पराभव
Ø
सातारा - उदयराजे भोसले ५ लाख २२ हजार २३१ मतांनी विजयी
Ø
अमरावती - शिवसेनेचे आनंदराव अडसुळ विजयी, नवनीत कौरचा पराभव
Ø
वर्धा - सागर मेघेंनी हरवत भाजपचे रामदास तडस विजयी
Ø
जालना - रावसाहेब दानवे २ लाख मतांनी विजयी
Ø
कल्याण - शिवसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे २ लाख २५ हजार मतांनी विजयी
Ø
लातूर - भाजपचे सुनील गायकवाड २ लाख ५३ हजार ३९५ मतांनी विजयी
Ø
उस्मानाबाद - रवी गायकवाड विजयी... राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते पद्मसिंह पाटील पराभूत
Ø
बुलडाणा - शिवसेनेचे प्रतापराव जाधव विजयी
Ø
लातूर - भाजपच्या सुनिल गायकवाड यांचा जवळपास २ लाख ५० हजार मतांनी विजय
दुपारी १.०० वाजता अपडेट - ६ मतदारसंघांचे निकाल हाती Ø
नाशिक - राष्ट्रवादी काँग्रेसच्या छगन भुजबळ यांचा दारुण पराभव... १ लाख ८७ हजार मतांनी झाला पराभव... महायुतीच्या हेमंत गोडसे यांचा विजय... तर मनसेचे उमेदवार डॉ. प्रदीप पवारांचं डिपॉझिट जप्त
Ø
कल्याण - शिवसेनेचे श्रीकांत शिंदे २ लाख १५ हजार मतांनी विजयी... राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवणाऱ्या आनंद परांजपे यांना पराभवाचा धक्का
Ø
जळगाव - भाजपचे ए. टी. पाटील २ लाख ७५ हजार मतांनी विजयी, राष्ट्रवादीचे माजी आमदार सतीष पाटील पराभूत, ए.टी.पाटील यांना दुसऱ्यांदा खासदारकी
Ø
रावेर - भाजपच्या रक्षा खडसे यांनी १ लाख ५० हजार मतांनी विजय
Ø
धुळे - भाजपच्या सुभाष भांबरेंचा विजय
Ø
दिंडोरी - हरिश्चंद्र चव्हाण २ लाख ४७ हजार मतांनी विजयी
दुपारी १२.३० वाजता अपडेटØ रायगडमधून शिवसेनेचे अनंत गिते 12 व्या फेरीत 1624 मतांनी आघाडीवर
Ø
रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून मुलाचा पराभव स्पष्ट झाल्यानं काँग्रेसचे नेते आणि उद्योगमंत्री नारायण राणे देणार राजीनामा Ø बीड - सहाव्या फेरीनंतर गोपीनाथ मुंडे ३२,००० मतांनी पुढे
Ø हिंगोली - सुभाष वानखेडे ५५२१ मतांनी आघाडीवर
Ø सातारा - १८ व्या फेरीअखेर उदयनराजे भोसले २,५१,६४३ मतांनी आघाडीवर
Ø अहमदनगर - सातव्या फेरीअखेर भाजपचे दिलीप गांधी ५६,८०४ मतांनी आघाडीवर
दुपारी १२.०० वाजता अपडेटØ अहमदनगर - पाचव्या फेरीअखेर भाजपचे दिलीप गांधी ४४,२०० मतांनी आघाडीवर
Ø हातकणंगले - नवव्या फेरीअखेर राजू शेट्टी ७६,६८२ मतांनी आघाडीवर
Ø सातारा - १८ व्या फेरीअखेर उदयनराजे भोसले २,३८,७०८ मतांनी आघाडीवर
Ø सांगली - भाजपचे संजय काका पाटील १ लाख ३५ हजार मतांनी आघाडीवर
Ø रायगड - अकराव्या फेरीअखेर रायगडमधून पुन्हा शिवसेनेचे अनंत गिते १८९२ मतांनी आघाडीवर
Ø ठाणे - दहाव्या फेरीअखेर राजन विचार १ लाख १४ हजार मतांनी आघाडीवर
Ø मावळ - अनंत बारणे १ लाखांहून अधिक मतांनी आघाडीवर
Ø गोपाळ शेट्टी अकराव्या फेरीअखेर २,४५,९०७ मतांनी आघाडीवर
Ø लातूर - भाजपचे सुनिल गाडकवाड १ लाख ५० हजार मतांनी आघाडीवर
Ø परभणी - १० व्या फेरीअखेर शिवसेना ३६,७८२ मतांनी आघाडीवर
सकाळी ११.३० वाजता अपडेटØ नितीन गडकरी ५७,००० मतांनी आघाडीवर... विजयाकडे वाटचाल
Ø अहमदनगर - भाजपचे दिलीप गांधी ३६,९९३ मतांनी आघाडीवर
Ø बुलडाणा - ५४,३१३ प्रतापराव जाधव आघाडीवर
Ø उस्मानाबाद - १२ व्या फेरीअखेर सेनेचे रवी गायकवाड १,१२,००० मतांनी आघाडीवर
Ø हिंगोली सुभाष वानखेडे १०३९ मतांनी आघाडीवर
Ø वर्धा - रामदास तडस ११ व्या फेरीनंतर ८८००० मतांनी आघाडीवर
Ø रत्नागिरी-सिंधुदुर्ग - आठव्या फेरीनंतर शिवसेनेच्या विनायक राऊतांची ६२ हजार १८२ मतांची निर्णायक आघाडी, काँग्रेसच्या नीलेश राणेंना धक्का
सकाळी ११.०० वाजता अपडेटØ सातारा - दहावा फेरीअखेरीस उदयनराजे भोसले १,३४,३७६ मतांनी आघाडीवर
Ø सांगली - संजय काका पाटील ९२,५९७ मतांनी आघाडीवर
Ø ठाणे - पाचव्या फेरीअखेर राजन विचारे ४८ हजार मतांनी आघाडीवर
Ø औरंगाबाद - पाचव्या फेरीअखेर चंद्रकांत खैरे २१,००० मतांनी आघाडीवर
सकाळी ११.०० वाजता अपडेटØ उस्मानाबाद - माजी मंत्री राष्ट्रवादीचे पद्मसिंह पाटील ६२ हजार मतांनी पिछाडीवर
Ø रायगड - चौथ्या फेरीत राष्ट्रवादीचे सुनील तटकरेंना ६३०८८ तर अनंत गितेंना ५८२७२ मते... तटकरेंना ४८१६ मतांची आघाडी
Ø पाचव्या फेरीत शिवसेनेचे राजन विचारे यांची ४८ हजार मतांची आघाडी
Ø शिवसेनेचे राहुल शेवाळे चौथ्या फेरीनंतर २५,६२० मतांनी आघाडीवर
Ø वर्धा- रामदास तडस 8 फेरीनंतर 81 हजार मतांनी आघाडीवर
Ø शिवसेनेचे अरविंद सावंत चौथ्या फेरीत घेतली आघाडी, ३३,४२८ मतांची आघाडी
Ø यवतमाळ वाशिम- शिवसेना भावना गवळी १२३७८ मतांनी आघाडीवर
सकाळी १०.४५ वाजता अपडेटØ हिंगोली - चौथ्या फेरीअखेरीस सुभाष वानखेडे ४७०० मतांनी आघाडीवर
Ø कोल्हापूर - धनंजय महाडिक २५ हजार मतांनी आघाडीवर
Ø
राखी सावंतला केवळ १५ मतं... Ø भाजपच्या पूनम महाजन सहाव्या फेरीनंतर ८९६४७ मतांनी आघाडीवर
सकाळी १०.४५ वाजता अपडेटØ लातूर - नवव्या फेरीअखेर भाजपचे सुनील गायकवाड जवळपास १ लाख मतांनी आघाडीवर
Ø बारामती - सातव्या फेरीअखेरीस सुप्रीया सुळे ११३४० मतांनी आघाडीवर
Ø नांदेड - काँग्रेसचे अशोक चव्हाण ७२५२ मतांनी आघाडीवर
Ø रायगड - चौथ्या फेरीअखेरीस सुनील तटकरे ४८१६ मतांनी आघाडीवर
Ø ठाणे - राजन विचारे चौथ्या फेरीअखेरीस ३९३४८ मतांनी आघाडीवर
Ø पालघर - दुसऱ्या फेरीअखेर भाज
सकाळी १०.३० वाजता अपडेटØ महाराष्ट्रात भाजप २२ जागांवर आघाडीवर तर शिवसेनेला १९ जागांवर आघाडी... काँग्रेस १ तर राष्ट्रवादीला ५ जागांवर आघाडी
Ø उस्मानाबाद - शिवसेनेचे रवी गायकवाड ६२,००० मतांनी आघाडीवर
Ø हिंगोली - तिसऱ्या फेरीअखेर शिवसेनेचे सुभाष वानखेडे ५९५४ मतांनी आघाडीवर
Ø माढा - सदाभाऊ खोत ९००० मतांनी आघाडीवर
Ø नागपूर - दुसऱ्या फेरीअखेरीस नितीन गडकरी ४२,००० मतांनी पुढे
Ø सातारा - सहाव्या फेरीअखेरीस उदयनराजे भोसले ८७,५९५ मतांनी आघाडीवर
Ø बारामती - सुप्रीया सुळे ८११८ मतांनी आघाडीवर
Ø जालना - सहाव्या फेरीअखेरीस रावसाहेब दानवे ६०,२२२ मतांनी आघाडीवर
Ø यवतमाळ-वाशिम - तिसऱ्या फेरीअखेर शिवसेनेच्या भावना गवळी ८३२७ मतांनी आघाडीवर
सकाळी १०.१५ वाजता अपडेटØ सांगली - भाजपचे संजय काका पाटील ३२,०२० मतांनी आघाडीवर
Ø वर्धा - चौथ्या फेरीअखेरीस भाजपचे रामदास कदम ३६,१६६ मतांनी आघाडीवर
Ø भंडारा - गोंदिया - सहाव्या फेरीअखेर नाना पटोले ६,३०० मतांनी आघाडीवर
Ø पुणे - अनिल शिरोळे - ५२,५५४ मतांनी आघाडीवर
Ø वाशिम-यवतमाळ - दुसऱ्या फेरीनंतर भावना गवळी - ३४०२ मतांनी आघाडीवर
Ø सातारा - पाचव्या फेरीअखेरीस उदयनराजे भोसले ८३,००० मतांनी आघाडीवर
Ø कल्याण - शिवसेनेचे श्रीकांत शिंदे आघाडीवर कायम, तिसऱ्या फेरीनंतर शिंदे आघाडीवर, ४४,०८१ मतांनी घेतली आघाडी
Ø लातूर - सुनिल गायकवाड १७००० मतांनी पुढे
Ø नांदेड - काँग्रेसचे अशोक चव्हाण जवळजवळ १२,००० मतांनी पुढे
Ø उस्मानाबाद - पाचव्या फेरीअखेरीस शिवसेनेचे रवि गायकवाड ४३,००० मतांनी आघाडीवर
Ø ठाणे - तिसऱ्या फेरीअखेरीस राजन विचारे २७,८९० मतांनी आघाडीवर
Ø रायगड - सुनिल तटकरे - २४१७ मतांनी आघाडीवर
Ø भिवंडी - तिसऱ्या फेरीअखेरीस भाजचे कपिल पाटील ४८८२ मतांनी आघाडीवर
Ø चंद्रपूर - हंसराज अहिर आघाडीवर
सकाळी १०.०० वाजता अपडेटØ महाराष्ट्रात भाजप १९ जागांवर आघाडीवर तर शिवसेनेला १७ जागांवर आघाडी... काँग्रेस ३ तर राष्ट्रवादीला २ जागांवर आघाडी
Ø पश्चिम महाराष्ट्रात १२ पैकी ८ जागांवर महायुतीला आघाडी
Ø ठाणे कोकणमध्ये ६ पैकी ६ जागांवर महायुतीला आघाडी
Ø उत्तर महाराष्ट्रात ६ पैकी ६ जागांवर महायुतीला आघाडी
Ø पश्चिम महाराष्ट्रात १२ पैकी ८ जागांवर महायुतीला आघाडी
Ø विदर्भात १० पैकी १० जागांवर महायुतीला आघाडी
Ø अकोला - भाजपचे संजय धोत्रे आघाडीवर
Ø उत्तर मुंबई - पहिल्या फेरीअखेरीस गोपाळशेट्टी ११,४६६ मतांनी आघाडीवर
Ø बुलडाणा - महायुती – प्रतापराव जाधव (शिवसेना) २२,००० मतांनी आघाडीवर
सकाळी ९.४५ वाजता अपडेटØ शिवसेनेचे राहुळ शेवाळे आघाडीवर ८,००० मतांनी आघाडीवर
Ø दुसऱ्या फेरीत शिवसेनेचे राजन विचारे १३,२५७ मतांनी आघाडीवर
Ø जालना - रावसाहेब दानवे आघाडीवर
Ø भाजपचे किरीट सोमय्या आघाडीवर
Ø माढा - विजय मोहिते पाटील तिसऱ्या फेरीनंतर 12 मतांनी आघाडीवर
Ø रायगडमधून शिवसेनेचे अनंत गिते आघाडीवर, राष्ट्रवादीचे सुनील तटके पिछाडीवर
सकाळी ९.३० वाजता अपडेटØ भंडारा गोंदिया - नाना पटोले आघाडीवर
Ø अमरावती - आनंदराव अडसूळ तिसऱ्या फेरीअखेरीस ३३,००० मतांनी आघाडीवर
Ø किरीट सोमय्या आघाडीवर
Ø वर्धा - रामदास तडस ९००० मतांनी आघाडीवर
Ø रामटेक - कृपाल तुमाले आघाडीवर
Ø भाजपच्या पुनम महाजन १५,००० मतांनी आघाडीवर... प्रिया दत्त पिछाडीवर
Ø रत्नागिरी-सिंधुदुर्गातून तिसऱ्या फेरीतही विनायक राऊत 18 हजार 425 मतांनी आघाडीवर
Ø पालघर - भाजपचे चिंतामन वानगा आघाडीवर
Ø शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रत्नागिरीत १२ वाजता पोहोचणार
Ø वर्धा - भाजपचे रामदास तडस ६००० मतांनी आघाडीवर
Ø यवतमाळ-वाशिम : शिवसेना भावना गवळी एक हजार मतांनी आघाडीवर
Ø नाशिक -भुजबळ 34 हजार मतांनी पिछाडीवर, हेमंत गोडसे आघाडीवर
Ø कल्याण - श्रीकांत शिंदे २८ हजार मतांनी आघाडीवर
सकाळी ९.१५ वाजता अपडेटØ परभणी - संजय जाधव आघाडीवर
Ø नागपूर - नितीन गडकरी पहिल्या फेरीअखेरीस २३,५६७ मतांनी आघाडीवर
Ø रत्नागिरी-सिंधुदुर्गातून शिवसेनेचे विनायक राऊत पहिल्या आणि दुसऱ्या फेरीत १८,४९० मतांनी आघाडीवर
Ø ठाणे - शिवसेनेचे राजन विचारे आघाडीवर, राष्ट्रवादीचे संजीव नाईक पिछाडीवर
Ø गडचिरोली - भाजपचे अशोक नेते आघाडीवर
Ø बीड - गोपीनाथ मुंडे आघाडीवर
Ø रत्नागिरी - शिवेसेनेचे विनायक राऊत पहिल्या फेरीअखेरीस ६८६० मतांनी आघाडीवर
Ø वर्धा - पहिल्या फेरीअखेरीस रामदास तडस ६००० मतांनी आघाडीवर
Ø पुणे - अनिल शिरोळे २५,११६ मतांनी आघाडीवर
सकाळी ९.०० वाजता अपडेटØ बारामती - दुसऱ्या फेरीनंतर सुप्रीया सुळे ११,५०० मतांनी आघाडीवर
Ø दिंडोरी - हरिश्चंद चव्हाण आघाडीवर
Ø औरंगाबाद - चंद्रकांत खैरे पहिल्या फेरीअखेरीस ७००० मतांनी आघाडीवर
Ø मुंबई उत्तर पश्चिम - गजानन किर्तीकर आघाडीवर, गुरुदास कामत पिछाडीवर
Ø दक्षिण मध्य मुंबई - शिवसेनेचे राहुल शेवाळे आघाडीवर
सकाळी ९.०० वाजता अपडेटØ नितीन गडकरी १०,००० मतांनी आघाडीवर
Ø महाराष्ट्रातून हेवीवेट नेते पिछाडीवर
Ø मावळमधून श्रीरंग बारणे आघाडीवर
Ø अहमदनगरमधून भाजपचे दिलीप गांधी आघाडीवर
Ø शिर्डीमधून सदाशिव लोखंडे आघाडीवर
Ø गोंदियातून प्रफुल्ल पटेल पिछाडीवर
Ø रत्नागिरी-सिंधुदुर्गात काँग्रेसचे उमेदवार नीलेश राणे पिछाडीवर... विनायक राऊत जवळपास ७,००० मतांनी आघाडीवर
Ø माढ्यातून सदाभाऊ खोत 1900 मतांनी आघाडीवर, विजय सिंह मोहिती पाटील पिछाडीवर
Ø हिंगोली सुभाष वानखेडे २००० मतांनी आघाडीवर
सकाळी ८.४५ वाजता अपडेटØ भिवंडीतून भाजपचे कपिल पाटील १०,५०० मतांना आघाडीवर
Ø मुंबई उत्तर पश्चिम उमेदवार : – गुरुदास कामत (काँग्रेस) आघाडीवर
Ø उत्तर मुंबईतून गोपाळशेट्टी आघाडीवर
Ø सांगली संजयकाका पाटील आघाडीवर
Ø माढा मतदारसंघातून सदाभाऊ खोत आघाडीवर
Ø सोलापूर सुशीलकुमार शिंदे पिछाडीवर
Ø जालना - रावसाहेब दानवे आघाडीवर
सकाळी ८.३० वाजता अपडेटØ औरंगाबाद - चंद्रकांत खैरे आघाडीवर
Ø पुण्यातून अनिल शितोळे आघाडीवर
Ø कोल्हापुरातून धनंजय महाडीक आघाडीवर
Ø अमरावतीतून आनंदराव आडसूळ आघाडीवर
Ø बीडमधून गोपीनाथ मुंडे आघाडीवर
Ø नांदेड - अशोक चव्हाण आघाडीवर
Ø साताऱ्यातून उदयराजे भोसले आघाडीवर
Ø शिरूमधून आढळराव पाटील आघाडीवर
सकाळी ८.३० वाजता अपडेटØ उस्मानाबाद - रवी गायकवाड ५६० मतांनी आघाडीवर
Ø हातकणंगले - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आघाडीवर
Ø नागपूरमध्ये २१६८ पोस्टल मतं
Ø रामटेकमध्ये १३५८ पोस्टल मतं
सकाळी ८.१५ वाजता अपडेटØ सोलापूर - सुशीलकुमार शिंदे आघाडीवर
Ø लातूर पत्रकारांना मतमोजणी केंद्रात प्रवेश नाकारल्यामुळे पत्रकारांचे ठिय्या आंदोलन... मतमोजणी केंद्राबाहेरच ठिय्या आंदोलन सुरू
Ø बारामती - पुरंदर विधानसभा मतदान केंद्रावर महादेव जानकर आघाडीवर
Ø कल्याण मतदारसंघात मतमोजणीला सुरुवात... ७७२ टपाली मतपत्रिकांचा समावेश
Ø बारामती - बारामती विधानसभा मतदारसंघातून सुप्रीया सुळे आघाडीवर
Ø गोरेगाव मतमोजणी केंद्रावर गोंधळ... आपचे कार्यकर्ते टोपी घालून आल्यानं काँग्रेस-भाजप कार्यकर्ते नाराज
सकाळी ८ वाजता अपडेटØ मतमोजणीला सुरुवात... सर्वप्रथम पोस्टल मतमोजणी होणार
Ø सांगली जिल्ह्यात शासनबंदी तर ममोजणी केंद्राजवळ जमावबंदीचे आदेश लागू.... कायदा आणि सुवव्यवस्था राखण्यासाठी एका दिवसासाठी आदेश...
सकाळी ७ वाजता Ø राष्ट्रवादीचे गोंदियाचे उमेदवार प्रफुल्ल पटेल सिद्धीविनायकाच्या दर्शनाला
Ø उत्तर मुंबईचे काँग्रस उमेदवार संजय निरुपम यांनी घेतले सिद्धीविनायकाचे दर्शन
Ø मनसेचे आदित्य शिरोडकर सिद्धिविनायकाच्या चरणी
Ø सिद्धिविनायक मंदीरात बाप्पाचं दर्शन घेऊन निकालाच्या दिवसाची शिवसेनेचे दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार राहुल शेवाळे केली सुरुवात...
महाराष्ट्रात तीन टप्प्यांत लोकसभा निवडणुकीसाठी मतदान नोंदलं गेलंय. पहिल्या टप्प्यांत विदर्भातील मतदार संघांमध्ये, दुसऱ्या टप्प्यात मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील मतदारसंघांमध्ये तर तिसऱ्या टप्प्यांत मुंबईसह कोकणातील मतदारसंघांमध्ये मतदान पार पडलं.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, May 16, 2014, 07:30