राज्यात दुसऱ्या टप्प्यात सरासरी ६१.८० टक्के मतदान

राज्यात दुसऱ्या टप्प्यात सरासरी ६१.८० टक्के मतदान
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या १९ मतदारसंघांमध्ये ३५८ उमेदवारांचं भवितव्य आज मतदान पेटीत बंद झालं.

राज्यात सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत सरासरी ६१.८०% मतदान
* लातूर - ६२ टक्के
* बीड - ६४ टक्के
* नांदेड – ६३ टक्के
* हिंगोली – ६३ टक्के
* रत्नागिरी-सिंधुदुर्ग – ६० टक्के
* उस्मानाबाद – ६५ टक्के
* परभणी – ६२ टक्के
* मावळ – ६३.१ टक्के
* पुणे – ५८.७५ टक्के
* बारामती – ५८.२ टक्के
* हातकणंगले - ७०.९० टक्के
* शिर्डी - ६१ टक्के
* कोल्हापूर - ६९.८० टक्के
* सोलापूर - ५७ टक्के
* शिरुर – ५९.५० टक्के
* अहमदनगर - ६० टक्के
* सांगली – ६५ टक्के
* माढा - ६२ टक्के
* सातारा – ५७ टक्के


१७६२ उमेदवारांचे भवितव्य EVM मशीनमध्ये बंद

देशभरातील १२१ जागांसाठी १७६२ उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद. महाराष्ट्रात १९ जागांसाठी मतदान संपले. एकूण ३५८ उमेदवार रिंगणात.

देशात आज पाचव्या टप्प्याचं तर राज्यातलं दुसऱ्या टप्प्याचं मतदान संपलं आहे. राज्यात सरासरी पाचपर्यंत 54 टक्के मतदान झालं आहे. या लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढलीय.

लातूर जिल्ह्यात अवकाळी पाऊस आल्याने मतदानावर परिणाम झाला असल्याचं सांगण्यात येतंय. लातूर जिल्ह्यात दुपारी पाचनंतर अवकाळी पाऊस बरसलाय. देशभरातील 121 मतदारसंघात हे मतदान शांततेत पार पडलं.

राज्यात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी अशी आहे, शिर्डीत ५४.६० %, बारामतीत ५०.४४ %, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये ५३.६३%, नांदेडात ५५.३०%, शिरुर ५३%, सांगली ५६.९१% आणि पुणे ५१.२०% मतदान झालं आहे.

या निवडणुकीत गोपीनाथ मुंडे, अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पश्चिम महाराष्ट्रात 12 तर मराठवाड्यात आठ तसेच कोकणात रत्नागिरी-सिंधुदुर्गात मतदान पार पडलं आहे.

सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत मतदानाची स्थिती

* लातूर - ५८ टक्के
* बीड - ५५ टक्के
* नांदेड – ५५.०३ टक्के
* हिंगोली – ५२.२ टक्के
* रत्नागिरी-सिंधुदुर्ग – ५३.६३ टक्के
* उस्मानाबाद – ५५.६१ टक्के
* परभणी – ४८.१८ टक्के
* मावळ – ५०.६५ टक्के
* पुणे – ५१.३२ टक्के
* बारामती – ५०.४४ टक्के
* हातकणंगले - ५९ टक्के
* शिर्डी - ५४ टक्के
* कोल्हापूर - ५८ टक्के
* सोलापूर - ४९ टक्के
* शिरुर - ५३ टक्के
* अहमदनगर - ५५ टक्के
* सांगली – ५६.९१ टक्के
* माढा - ५२ टक्के
* सातारा – ५०.३२ टक्के

रत्नागिरी-सिंधुदुर्ग
उद्योगमंत्री नारायण राणेंनी त्यांच्या कुटुंबीयांनी कणकवलीत त्यांच्या वरवडे या मूळ गावी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्याबरोबर त्यांचे कुटुंबीयही उपस्थित होते तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे बंडोखोर नेते दीपक केसरकरांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदारांनी मतदान करून सिंधुदुर्गातला दहशतवाद संपवावा, असं आवाहन त्यांनी मतदारांना केलंय. 

लातूर
काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या कुटुंबीयांनी बाभळगाव इथं मतदानाचा हक्क बजावला. मतदानाला जाण्यापूर्वी त्यांनी विलासरावांच्या समाधीचं दर्शन घेतलं. विलासरावांच्या पत्नी वैशालीताई, लातूरचे आमदार अमित देशमुख, अभिनेता रितेश, धीरज देशमुख, विलासरावांचे धाकटे बंधू दिलीप देशमुख हे यावेळी हजर होते. लातूरचे काँग्रेस उमेदवार दत्तात्रय बनसोडे यांच्या प्रचारासाठी देशमुख कुटुंबानं बरंच काम केलं होतं.

लातूरमध्ये मतदानाला पावसाचा अडथळा...
लातूरमध्ये ऐन मतदान सुरू असतानाच गारांसह मुसळधार पावसाला सुरुवात झालीय. वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झालीय. त्यामुळे काही ठिकाणी मतदानावर परिणाम झालाय. अचानक पाऊस आल्यानं मतदारांची प्रचंड तारांबळ उडाली.... तसंच काही मतदानकेंद्रांच्या मंडपांचंही नुकसाना झालं. काही ठिकाणी चक्क खुर्च्याही उडून गेल्या. पावसामुळे सखल भागांत पाणी साचलंय. रेणापूर, चाकूर, निलंगा आणि औसा तालुक्यात हा अवकाळी पाऊस झालाय.

शिर्डी
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनीही मतदान केलं. शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात आणि प्रवरानगरमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांनी मतदान केलं.

पुणे / रत्नागिरी : मतदार याद्यांचा घोळ
पुण्यात मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ झालाय.पुण्यात अनेक ठिकाणी बोगस मतदानाचा फटका बसला. मतदार कार्ड घेऊन मतदानकेंद्रावर जाऊन पोहोचावं, तर आधीच कुणीतरी त्या नावावर मतदान केल्याचं समोर आलं. तसंच हजारो मतदारांची नावं मतदार यादीतून गायब झालीयत. त्यामुळे शिवाजीनगर परिसरात अनेक मतदारांना मतदान करता आलं नाही. यात अनेक सेलिब्रिटींचाही समावेश आहे. गायक-संगितकार सलील कुलकर्णी, अभिनेता सिद्धार्थ चांदेकर, प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक अमोल पालेकर  आणि संध्या गोखले यांची नावेही मतदार यादीतून गायब आहेत. पुण्यापाठोपाठ पिंपरी-चिंचवडमध्येही हाच अनुभव आलाय तर रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातही अनेक मतदारांचं नाव मतदार यादीत नव्हतं.
रत्नागिरीत वर्षानुवर्ष मतदान करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचीही नावं गायब झाली होती. तर हिंगोली लोकसभा मतदार संघातही बोगस मतदानाच्या तक्रारी समोर आल्या.  

राज्यात दुपारी ३.०० वाजेपर्यंत सरासरी ४२% मतदान
* लातूर - ४७ टक्के
* बीड - ४८.३२ टक्के
* नांदेड - ४६ टक्के
* हिंगोली - ४० टक्के
* रत्नागिरी-सिंधुदुर्ग - ४३.२८ टक्के
* उस्मानाबाद - ४७ टक्के
* परभणी - ४१ टक्के
* मावळ - ३३.९१ टक्के
* पुणे - ३३.९१ टक्के
* बारामती - ३४.९८ टक्के
* हातकणंगले - ५५.९६ टक्के
* शिर्डी - ३७ टक्के
* कोल्हापूर - ५५.३३ टक्के
* सोलापूर - ३९.२७ टक्के
* शिरुर - ३६.८७ टक्के
* अहमदनगर - ३५ टक्के
* सांगली - ४७ टक्के
* माढा - ४४.४३ टक्के
* सातारा - ४१.२१ टक्के


राज्यात दुपारी १.०० वाजेपर्यंतचं मतदान
* नांदेड - ३३ टक्के
* अहमदनगर - २१ टक्के
* शिर्डी - २१ टक्के
* लातूर - ३२.७० टक्के
* बीड - ३६.९६ टक्के
* सांगली - ३१.४८ टक्के
* हिंगोली - ३०.६५ टक्के
* सोलापूर - ३१.१० टक्के
* परभणी - ३५.२९ टक्के
* पुणे - २६.२५ टक्के
* बारामती - २६.९० टक्के
* मावळ - २६ टक्के
* शिरुर - २८.७५ टक्के
* उस्मानाबाद - ३६.४१
* माढा - ३५.१४
* सातारा - ३०.२३
* रत्नागिरी-सिंधुदुर्ग - ३२.९४ टक्के
* कोल्हापूर - ४० टक्के
* हातकणंगले - ३९.८० टक्के


दुपारी १२.०० वाजेपर्यंत मतदानाचं चित्र
पुणे
पुण्यात मतदार याद्यात असलेला घोळ उघड झालाय. मतदार यादीत नावचं नसल्याने अनेक सामान्य नागरीक, सेलिब्रिटी, मतदानाच्या हक्कापासून वंचित राहीलेत. सलील कुलकर्णी, सिद्धार्थ चांदेकर, अमोल पालेकर यांची नावं मतदारयादीतच नसल्यामुळे त्यांना मतदानापासून वंचित राहावं लागलं. या सेलिब्रिटींसह अनेक पुणेकरांना मतदान करता आलं नाही

पुणे : अशोक चव्हाणांइतका मी नशिबवान नाही - कलमाडी
काँग्रेसची उमेदवारी न मिळाल्यानं पुण्याचे खासदार सुरेश कलमाडी यांची नाराजी कायम असल्याचं पुढं आलंय. अशोक चव्हाण नशीबवान आहेत, मी नाही अशी नाराजी दर्शवणारी प्रतिक्रिया त्यांनी मतदान केल्यानंतर दिलीय. युथ कॉमनवेल्थ गेम्सप्रकरणी घोटाळ्याचे आरोप झाल्यामुळं कलमाडी यांचा पत्ता कापून विश्वजीत कदम यांना तिकीट देण्यात आलं. त्यामुळं सुरूवातीला कलमाडी नाराज झाले होते. मात्र ही नाराजी दूर करण्यात काँग्रेस नेत्यांना यश आल्याचं सांगण्यात येत होतं. परंतू आज मतदान केल्यानंतर कलमाडी यांनी उमेदवारीबाबत पक्षश्रेष्ठी वेगवेगळा न्याय देत असल्याची सल आज व्यक्त करून दाखवली.

पुणे : सेलिब्रिटीही मतदानाच्या रांगेत
पुण्यात सकाळपासूनच सेलिब्रिटीही मतदानाच्या रांगेत उभे असलेले पाहायला मिळाले. ज्येष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकरांनी मतदान केलं. तर ज्येष्ठ मुलाखतकार निवेदक सुधीर गाडगीळांनी सकाळीच आपला मतदानाचा हक्क बजावला.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग
सिंधुदुर्गमध्ये शांततेत मतदान सुरू आहे. आत्तापर्यंत रत्नागिरी- सिंधुदुर्गात २३ टक्के मतदान झालंय. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात तुंबळ लढत होतेय. निलेश राणे विरुद्ध विनायक राऊत या लढतीला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या नाराजीचीही किनार आहे. कणकवलीमध्येही मोठ्या उत्स्हात मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदनासाठी लांबचलांब रांगा लागल्या आहेत.

सांगली
सांगली लोकसभा मतदारसंघात मतदानाचा उत्साह दिसून येतोय. सांगलीत १६ लाख ४७ हजार  मतदार आहेत. भाजपचे  उमेदवार संजय काका पाटील यांनी चिंचणी येथे तर, काँग्रेसचे  उमेदवार प्रतीक पाटील यांनी सांगलीतून मतदानाचा हक्क  बजावला. 

सातारा
साताऱ्याचे राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनीही मतदानाचा अधिकार बजावलाय. उदयनराजेंबरोबरच एकूण १८ उमेदवार आपलं नशिब आजमावतायत. साताऱ्यात एकूण २९४३ मतदान केंद्रे आहेत.

हातकणंगले
हातकणंगले मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार राजू शेट्टी यांनीही मतदान केलं. काँग्रेसच्या कलाप्पा आवाडे यांच्याशी त्यांची थेट लढत होतीय. हातकणंगले मतदारसंघातल्या या लढतीकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय.

राज्यात सकाळी ११.०० वाजेपर्यंत
* लातूर - २०.२९ टक्के
* बीड - २१.८४ टक्के
* हिंगोली - १९.९१ टक्के
* रत्नागिरी-सिंधुदुर्ग - २३ टक्के
* उस्मानाबाद - २३ टक्के
* शिर्डी - १५ टक्के
* सोलापूर - १४.४२ टक्के
* परभणी - २५.८९ टक्के
* मावळ - १६ टक्के
* पुणे - १४.५ टक्के
* शिरुर - १९ टक्के
* माढा - १७.९६ टक्के
* अहमदनगर - ११ टक्के
* सांगली - २१ टक्के
* सातारा - १७.३२ टक्के
* नांदेड - २१ टक्के
* उस्मानाबाद - २२.५० टक्के
* कोल्हापूर - २२.५९ टक्के
* हातकणंगले - २०.२९ टक्के

सकाळी १०.०० वाजेपर्यंत
* रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात १९०४ मतदान केंद्रांवर १३ लाख ६३ हजारांहून अधिक कोकणवासिय आपल्या मतदानाचा हक्क बजावतायत. एकूण १० हजार ५२१ कर्मचारी कार्यरत आहेत. अनेक मतदारांची नाव मतदारयादीत नसल्याने नागरिकांची निराशा झालीय.

* राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडमधील उमेदवार सुरेश धस यांनी मतदानाचा हक्क बजावला.

* सांगली लोकसभा मतदार संघात मतदानाला सुरवात झालीय. १६ लाख ४७ हजार  मतदार मतदानाचा अधिकार बजावतायत. भाजपचे  उमेदवार संजय काका पाटील यांनी चिंचणी येथे तर काँग्रेसचे  उमेदवार  प्रतीक पाटील यांनी सांगलीतून मतदानाचा हक्क  बजावला.  सकाळच्या टप्यात  मतदारांनी  मतदानासाठी  उस्फुर्त प्रतिसाद दिलाय.

* पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार दीपक पायगूडे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

* बीडमध्ये भाजपचे उमेदवार गोपीनाथ मुंडे यांनी मतदान केलंय.

* बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मतदान केलंय. बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या विद्यमान खासदार सुप्रीया सुळे रिंगणात आहेत. तर महायुतीचे महादेव जानकर त्यांच्याशी लढत देतायत. सुप्रीया सुळे यांनीही सकाळीच मतदानाचा हक्क बजावला.

* ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी राळेगणसिद्धीमधून आपला मतदानाचा हक्क बजावला.

* मावळ लोकसभा मतदार संघात सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. अजून म्हणावा तसा उत्साह दिसत नसला तरी अनेकजण मतदानासाठी बाहेर पडलेत. शेकाप आघाडीचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांनी आज सकाळी ७ वाजताच कुटुंबीयांसमवेत मतदान केलं. आपण जिंकून येऊ असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

९.००पर्यंत एकूण मतदान-१२%
रत्नागिरी-सिंधुदुर्ग-१०.५०%
उस्मानाबाद-१०%
सोलापूर-१०%
नांदेड-८.५%
मावळ-६.५%
शिरुर-१९%
सोलापूर-८.७%
कोल्हापूर-१०%
हातकणंगले-१०%
सांगली-१०%
सातारा-७.३३%
शिर्डी-७%
नांदेड-८.५%
बीड-१०%
अहमदनगर-७%
माढा-७.२९%
परभणी-११%
लातूर-१३%
हिंगोली-९.५%
उस्मानाबाद-९.५%
पुणे-९%


सकाळी ७.०० वाजता

* बारामतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळेंनी मतदानाचा हक्क बजावला.

* सोलापूरमध्ये सुशील कुमार शिंदे आणि त्यांच्या कन्या प्रणिती शिदें यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी माझ्या मतदारसंघात नरेंद्र मोदींचा नाही तर शिंदेंचा प्रभाव आहे असं म्हणत मोदींवर टीका केली.




पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग अशा एकूण १९ मतदारसंघांमध्ये आज मतदान होतंय. मराठवाड्यातल्या सहा तर पश्चिम महाराष्ट्रातल्या १२ जागांवर आज मतदान होतंय. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे, शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे, पद्मसिंग पाटील, डॉ.निलेश राणे आदी दिग्गज नेते या टप्प्यात निवडणूक रिंगणात आहेत. यासोबत देशभरात १२ राज्यातल्या १२१ मतदारसंघांमध्ये अनेक ठिकाणी मतदानाला सुरूवातही झालीय.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, April 17, 2014, 07:59
First Published: Friday, April 18, 2014, 07:32
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?