मोदींची पाकिस्तानला धडकी, केवळ मोदींचीच चर्चा

मोदींची पाकिस्तानला धडकी, केवळ मोदींचीच चर्चा
www.24taas.com, झी मीडिया, इस्लामाबाद

16 मेला साऱ्या जगाची नजर भारताकडे लागलेली असेल. आपलं शेजारी राष्ट्र पाकिस्तानची तर आत्ताच पायाखालची वाळूच सरकलीय. सध्या नरेंद्र मोदींची चर्चा पाकिस्तानमध्ये चांगलीच रंगलीय. पाकिस्तानी मीडियात तर केवळ नरेंद्र मोदीच झळकत आहेत. एवढंच नव्हे तर दहशतवादी हाफिज सईद याचेदेखील चांगलेच धाबे दणाणलेत.

पाकिस्तानमध्ये आजकाल नरेंद्र मोदींवर चर्चा रंगत आहे. प्रत्येक न्यूज चॅनलवर मोदींवर डिबेट्स होत आहेत. जर नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान झाले तर पाकिस्तानच काय होईल हाच प्रश्न चर्चिला जात आहे.

मोदींमुळं तर दहशतवादी हाफिज सईद याचेही धाबे दणाणलेत. `जमात उद दावा` या अतिरेकी संघटनेचा प्रमुख हाफिज सईद मुंबईवरील हल्ल्याचा मास्टरमाईंड मानला जात आहे. हाच हाफिज पाकिस्तानमध्ये खुलेआम फिरत असतो. मात्र, हाफिज सईदला सध्या मोदींच्या नावांची स्वप्न पडत आहेत. सध्या तो चांगलाच सैरभैर झालाय.

हाफिज सईदची मुलाखत

एँकर - भारतीय जनता पक्षानं नेहमीच दावा केलय की मुंबई ट्रायल पाकिस्तान करत नाहीय. लोकांना अटक केली जावी. लखवीला अटक केलीय. इतर काही लोकांना अटक केलीय. आता नरेंद्र मोदी पंतप्रधान बनतील तेव्हा दबाव वाढेल ?


हाफिज सईद - सर्वात प्रथम नरेंद्र मोदी कोण आहेत हे पहावं...नरेंद्र मोदी हे सर्वात मोठे खूनी आहेत. ते कट्टर हिंदुत्ववादी आहेत. गोध्रा हत्याकांड त्यांनी घडवलं. त्यांनी हजारो मुसमानांना ठार केलंय.

एँकर - हाफिज सईद पाकिस्तानचे नरेंद्र मोदी आहेत की नरेंद्र मोदी भारताचे हाफिज सईद आहेत.

हाफिद सईद - संपूर्ण पाकिस्तानमध्ये माझ्याविरुद्ध एकही एफआयआर नाही. मी तर हिंदुंचा प्रशंसक आहे. हिंदुंना मदत करु इच्छितो. आमची वृत्ती ही आहे. मात्र मोदी तिकडे मुस्लिमानांचं हत्याकांड घडवतात.

एकूणचनरेंद्र मोदींमुळे पाकिस्तानच्या पायाखालची जमिनच सरकलीय. मात्र मोदींची केवळ एकच बाजू दाखवली जातेय, असं नाही मोदींच्या प्रत्येक बाबींवर तिकडे चर्चा रंगत आहेत. आता पाकिस्तानलाही आपल्या भूमिकेमध्ये बदल करण्याची गरज निर्माण झालीय. तरच ते सत्याला समजू शकतील आणि ते मान्यही करतील.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, May 13, 2014, 15:46
First Published: Tuesday, May 13, 2014, 15:48
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?