Last Updated: Tuesday, May 13, 2014, 15:48
16 मेला साऱ्या जगाची नजर भारताकडे लागलेली असेल. आपलं शेजारी राष्ट्र पाकिस्तानची तर आत्ताच पायाखालची वाळूच सरकलीय. सध्या नरेंद्र मोदींची चर्चा पाकिस्तानमध्ये चांगलीच रंगलीय. पाकिस्तानी मीडियात तर केवळ नरेंद्र मोदीच झळकत आहेत. एवढंच नव्हे तर दहशतवादी हाफिज सईद याचेदेखील चांगलेच धाबे दणाणलेत.