मुस्लीमांनी मोदींना विजय मिळवून दिला - आजम खान

मुस्लीमांनी मोदींना विजय मिळवून दिला - आजम खान
www.24taas.com, झी मीडिया, पाटणा

भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका करणारे समाजवादी पार्टी नेते आजम खान यांनी पुन्हा एकदा मोदींना लक्ष्य केलंय. मुस्लीम मतदारांनीच मोदींना विजय मिळवून दिला आहे, असे व्यक्तव्य आजम खान यांनी केलंय.

लोकसभा निवडणुकीत भाजपला मुसलमानांनी मदत केली आहे. मोदी यांच्या विजयात मुस्लीमांचे योगदान आहे. त्यामुळे मुसलमानांनी आपला धर्मनिरपेक्ष असल्याचे दाखवून दिले आहे. मोदी यांच्या विजयानंतर ते अधिक अधोरेखीत झाले आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्या खोट्या आश्वासनांवर मुलसमानांनी विश्वास ठेवला आहे. मात्र, मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायमसिंग यांची पाठराखन केलेय. युपीए सरकारच्या धोरणामुळे उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी पराभूत झाल्याचे आजम खान यांनी म्हटलेय.

भाजप नेते कलराज मिश्र यांनी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या राजीनाम्याची मागणी केली. मात्र, ती चुकीची असून आम्ही पराभवाचा आस्वाद घेत आहोत. मात्र, काँग्रेसच्या महागाई आणि भ्रष्टाचारामुळे हा परिणाम दिसून आला आहे. अखिलेश यादव यांनी राजीनामा देण्याची गरज नाही. खोटे आश्वासन दिल्याने मुस्लीमांची मते भाजपला मिळालीत, असे आजम खान यांनी म्हटलेय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, May 20, 2014, 11:25
First Published: Tuesday, May 20, 2014, 11:25
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?