मराठा आरक्षणाचा निर्णय 21 जूनला करणार जाहीर - राणे

Last Updated: Friday, June 13, 2014, 17:15

मराठा आरक्षणाचा निर्णय येत्या 21 जूनला जाहीर करण्यात येईल, असं ठाम आश्वासन उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आज विधान परिषदेत दिलं. मराठा आरक्षणाचा मुद्दा विधान परिषदेत उपस्थित करण्यात आला होता. त्याला उत्तर देताना राणेंनी ही माहिती दिली.

मुस्लिमांच्या सशक्तिकरणासाठी कटीबद्ध – मोदी

Last Updated: Thursday, June 12, 2014, 13:51

हिंदुत्वाची प्रतिमा असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी संसदेतील भाषणात मुसलमानांच्या सशक्तीकरणावर जोर दिला आहे. मुसलमानांच्या परिस्थितीत आम्हांला बदल आणला पाहिजे, समाजाचे एक अंग कमकुवत राहिले तर समाज सुदृढ होऊ शकत नाही.

`मंदिर उभारणीसाठी मुस्लिम समुदाय स्वत:च विरोध सोडणार`

Last Updated: Tuesday, June 10, 2014, 19:35

केंद्रात भाजपचं सरकार आल्यानंतर, अयोध्येमध्ये राम मंदिर उभारण्यासाठी मुस्लिम समुदाय आपला विरोध सोडून देईल, अशी आशा आता विश्व हिंदू परिषदेला (व्हिएचपी) निर्माण झालीय.

मुस्लीमांनी मोदींना विजय मिळवून दिला - आजम खान

Last Updated: Tuesday, May 20, 2014, 11:25

भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका करणारे समाजवादी पार्टी नेते आजम खान यांनी पुन्हा एकदा मोदींना लक्ष्य केलंय. मुस्लीम मतदारांनीच मोदींना विजय मिळवून दिला आहे, असे व्यक्तव्य आजम खान यांनी केलंय.

... तर मुस्लिमांची डीएनए टेस्ट करावी लागेल - अबू आझमी

Last Updated: Friday, May 2, 2014, 15:40

उत्तरप्रदेशात मुस्लिमबहुल भागांमध्ये प्रचार करतांना जे मुसलमान समाजवादी पार्टीला मत देणार नाहीत त्यांची डीएनए टेस्ट करावी लागेल असं खळबळजनक विधान अबु आझमींनी केलंय. भाजपच्या मुख्तार अब्बास नकवींनी अबु आझमींवर या विधानाप्रकरणी टीकास्त्र सोडलयं.

मुस्लिमांनी जातीयवादी व्हावं, शाझिया इल्मींचं वादग्रस्त वक्तव्य

Last Updated: Wednesday, April 23, 2014, 17:41

मुस्लिम नागरिकांनी धर्मनिरपेक्षपणा थांबवून मतदान करावं आणि या निवडणुकीत जातीयवादी व्हावं, असं वादग्रस्त वक्तव्य गाझियाबाद इथल्या आम आदमी पक्षाच्या (आप) उमेदवार शाझिया इल्मी यांनी केलं आहे.

`कारगिलचा विजय हिंदू नाही तर मुस्लिम सैनिकांमुळे`

Last Updated: Wednesday, April 9, 2014, 08:12

बऱ्याचदा आपल्या वादग्रस्त वक्त्यव्यांसाठी चर्चेत राहणारे समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे मंत्री आझम खान यांनी पुन्हा असंच एक बेजबाबदार आणि वादग्रस्त विधान केलंय.

चाकूधारी गटानं केलेल्या हल्ल्यात २७ ठार, ११३ जखमी

Last Updated: Sunday, March 2, 2014, 10:03

वायव्य चीनमधल्या कुनीमंगमधल्या रेल्वे स्टेशनवर एका गटानं केलेल्या चाकू हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू झाला असून ११३ जण जखमी झाल्याची माहिती मिळतेय.

`देशातील भ्रष्टाचार मुसलमानांसाठी एक वरदान` - बुखारी

Last Updated: Sunday, February 23, 2014, 14:27

`देशातील भ्रष्टाचार अल्पसंख्याकांसाठी एक वरदानच आहे, कारण देशातील भ्रष्टाचार आणखी शंभर वर्षे तरी संपणार नाही.

आता, मुस्लिमांनाही मूल दत्तक घेण्याचा हक्क

Last Updated: Wednesday, February 19, 2014, 21:23

सुप्रीम कोर्टानं नुकताच एक महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय. यानुसार, भारतातील मुस्लिमांनाही मुलं दत्तक घेण्याचा हक्क प्रदान करण्यात आलाय.

मुस्लिमच ठरवतात भारताचा पंतप्रधान- अय्यर

Last Updated: Wednesday, November 6, 2013, 11:13

ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर यांनी शारजामध्ये भारताचा पंतप्रधान मुस्लिमच ठरवत असल्याचं विधान केलं.

राहुल गांधींविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

Last Updated: Saturday, October 26, 2013, 07:41

उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरमध्ये उसळलेल्या जातीय दंगलीला आयएसआयची मदत असल्याचं वक्यव्य काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी केलं होतं. त्याविरोधात भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय. तसेच समाजवादी पक्षानेही राहुल गांधींवर जातीयवादी असल्याची टीका केलीय.

निवडणुकीच्या तोंडावर... मुस्लिम आरक्षण?

Last Updated: Tuesday, October 22, 2013, 20:21

मुस्लिम समाजाला सरकारी नोकऱ्यांमध्ये तसेच शिक्षण क्षेत्रात किमान आठ टक्के आरक्षण ठेवण्याची महत्त्वपूर्ण शिफारस डॉ. महेमुदूर रहमान यांच्या अध्यक्षतेखालील अभ्यासगटानं केलीय. निवडणुकांच्या तोंडावरच असे अहवाल का सादर होतात, याचा हा आढावा...

मुस्लिमांना आठ टक्के आरक्षण देण्याची शिफारस!

Last Updated: Tuesday, October 22, 2013, 17:52

सरकारी नोकरीत मुस्लिमांना आठ टक्के आरक्षण देण्याची शिफासर राज्य सरकारनं नेमलेल्या एका अभ्यासगटानं केलीय.

`अल्ला... हा शब्द मुस्लिमांसाठी; इतरांनी तो वापरू नये`

Last Updated: Tuesday, October 15, 2013, 16:58

‘अल्ला’ हा शब्द फक्त मुस्लिमांसाठीच आहे इतर धर्मियांना तो वापरता येणार नाही, असा धक्कादायक निकाल मलेशियातील एका कोर्टानं दिलाय. महत्त्वाचं म्हणजे, हा निकाल देणारे कोर्टाचे तीन जजही मुस्लिम धर्मीयच आहेत.

अल्पसंख्याकांना आकर्षित करण्यासाठी मोदींची दहा सूत्रं!

Last Updated: Sunday, September 22, 2013, 15:33

भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी अल्पसंख्याकांना आकर्षित करून घेण्यासाठी दहा सूत्रीय अभियान राबविण्याचे ठरविले आहे. गुजरात दंगलीमुळं भाजपापासून दुरावलेल्या मुस्लिम मतदांराचं मतपरिवर्तन करण्यासाठी आणि त्यांची चाचपणी करण्यासाठी दिल्लीत रॅलीचं आयोजन करण्यात आलंय.

हिंदूंची हत्या करू नका - अल कायदा

Last Updated: Wednesday, September 18, 2013, 09:29

अल कायदा या दहशतवादी संघटनेने नवा आदेश काढला आहे. हिंदूंची हत्या करू नका, असे म्हटले आहे. मुस्लिमांच्या भूमीवर हिंदूंची हत्या करू नका, असे या आदेशात अल कायदाच्या मोरक्याने म्हटले आहे.

काटजूंनी मोदींविरोधात ओकली पाकिस्तानात आग

Last Updated: Monday, February 25, 2013, 17:46

प्रेस काउंसिल ऑफ इंडिया आणि माजी न्यायाधिश मार्कंडेय काटजू यांनी पाकिस्तानच्या एक्सप्रेस ट्रिब्युन या वर्तमान पत्रात गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लेख लिहिल्यामुळे त्यांच्यावर भारतात टिकेची झोड उठली आहे.

`विश्वरूपम`वर प्रदर्शनाआधीच घातली बंदी

Last Updated: Thursday, January 24, 2013, 22:23

कमल हसनच्या विश्वरुपम सिनेमाला मद्रास हायकोर्टानं स्थगिती दिलीय. त्यामुळे उद्या हा सिनेमा प्रदर्शित होऊ शकणार नाही.

`विश्वरूपम` मुस्लिम विरोधी?

Last Updated: Sunday, January 6, 2013, 19:45

डीटीएच प्लॅटफॉर्मवरून आपला नवा सिनेमा ‘विश्वरुपम’ रिलीज करणाऱ्या कमल हासनचा नवा सिनेमा मुस्लिम विरोधी असल्याचं म्हटलं जात आहे. यावर कमल हासनने स्पष्टीकरण देताना हा सिनेमा मुस्लिमविरोधी नसल्याचं म्हटलं आहे.

`हज हाऊस`साठी `रिपाइं` मैदानात

Last Updated: Tuesday, December 18, 2012, 22:06

औरंगाबादेत आज हज हाऊसच्या प्रश्नाने आक्रमक वळण घेतलं. गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादेत मुस्लिम संघटनाचं ‘हज हाऊस’साठी आंदोलन सुरु आहे. त्यात आता आरपीआयने उडी घेतली आहे.

मुस्लिमांना हवेत गुजरातमध्ये मोदी - सरेशवाला

Last Updated: Tuesday, December 4, 2012, 17:36

गुजरातमध्ये जे दंगे उसळले होते. त्यावरून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर चहुबाजूने टीका करण्यात येत असताना मुस्लिमांना गुजरातमध्ये मोदीच हवे आहेत. हे सांगितले उद्योगपती जफर सरेशवाला यांनी. त्यांनी मुस्लिमांना आवाहन केलेय की, मोदींच्या पाठिशी राहा.

म्यानमारमध्ये जातीय हिंसाचार, दोन ठार

Last Updated: Wednesday, October 24, 2012, 16:09

म्यानमारच्या पश्चिम भागात मुस्लिम आणि बौद्ध धर्मीयांमध्ये जातीय तणाव निर्माण झालाय. यावेळी काही प्रमाणात हाणामारीच्या आणि जाळपोळीच्या घटनाही घडल्याचं समजतंय. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झालाय.

`मुस्लिमच वाढवतायत देशाची लोकसंख्या!`

Last Updated: Sunday, September 9, 2012, 17:32

आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी राज्यातील वाढत्या मुस्लिम लोकसंख्येसाठी बांग्लादेशी निर्वासितांना दोषी न धरता भारतातीलच मुस्लिमांना दोषी मानलं आहे. मागासलेपण, अपूर्ण शिक्षण यामुळे भारतीय मुस्लिम कुटुंब नियोजनासारख्या प्रगत गोष्टींचा विचार नकरता अधिकाधिक मुलं जन्माला घालतात. यामुळेच देशातील मुस्लिमांची लोकसंख्या वाढत असल्याची टीका त्यांनी केली आहे.

इराकमध्ये १४ शिया मुस्लिमांची हत्या

Last Updated: Monday, August 13, 2012, 18:01

इराकच्या उत्तर भागातील किरकूकमध्ये अज्ञान बंदूकधाऱ्यांनी १४ जणांची गोळ्या घालून हत्या केलीय. हे १२ जण मुस्लीम होते. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हे सगळे जातीय हिंसेचे बळी ठरले आहेत.

सूर्यनमस्काराला आता ख्रिश्चनांचाही विरोध

Last Updated: Thursday, January 12, 2012, 16:23

मुस्लीम नेत्यांच्या कडव्या विरोधानंतरही मध्यप्रदेश सरकार वार्षिक राज्यस्तरीय सूर्यनमस्कार कार्यक्रमावर ठाम असल्याचे दिसून येत आहे. कार्यक्रम होण्याचे संकेत मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिलेत.

मुस्लिम आरक्षणाला स्थगिती

Last Updated: Wednesday, January 11, 2012, 23:28

निवडणूक आयोगानं केंद्र सरकारच्या मुस्लिमांना आरक्षण देण्याच्या निर्णयावर स्थगिती दिली आहे. पाच राज्यातल्या विधानसभा निवडणुका होईपर्यंत या निर्णयावर स्थगिती देण्यात आली आहे.

मुस्लिम आरक्षणाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Last Updated: Thursday, December 22, 2011, 20:45

केंद्रीय मंत्रिमंडळाने मुस्लिम आरक्षणाला मंजुरी दिली आहे. अन्न सुरक्षा विधेयका पाठोपाठ आणखीन एक महत्वपूर्ण विधेयकाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मुस्लिम समाजाच्या वास्तव परिस्थिती संदर्भात अभ्यासाठी केंद्र सरकारने सच्चर आयोगाची नियुक्ती केली होती. सच्चर आयोगाने मुस्लिम समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक परिस्थितीचा आढावा घेऊन अहवाल सादर केला होता.