शिवाजी माने राष्ट्रवादीत, पिचडांचा फुसकाबार

www.24taas.com,  मुंबई
 
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शिवाजी माने यांनी उपमुख्य़मंत्री अजित पवार यांच्या उपस्थित अधिकृत प्रवेश केला. शिवाजी माने हे काँग्रेस हिंगोलीचे जिल्हाध्यक्ष आहेत.
 
दरम्यान, एका पक्षाचा अध्यक्ष आणि खासदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येणार असून उद्या राष्ट्रवादी राजकीय भूकंप करणार असल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांनी काल सांगलीत केला होता. मात्र, ते काँग्रेस हिंगोलीचे जिल्हाध्यक्ष आणि माजी खासदार असल्याने त्यांचा बार फुसका निघाल्याची चर्चा आहे.
 
विकास करणारा एक पक्ष हा राष्ट्रवादी आहे. त्यामुळे अनेक जण राष्ट्रवादीत येत असल्याचे पिचड यांनी सांगितले. परंतु, पिचड यांनी केवळ हिंट दिली असून त्या खासदाराचे नाव गुलदस्त्यात ठेवले होते.  राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी गौप्यस्फोट केल्यामुळे अनेक तर्क वितर्कांना उधाण आले  होते. या संदर्भात अनेक खासदार आणि इतर पक्षातील असंतुष्ट अध्यक्षांच्या नावांची नावे समोर येत आहेत. यात रामदास आठवले, सुरेश शेट्टी, पांडुरंग फुंडकर यांचेही नावेही चर्चेत होती.
 
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे धक्कातंत्र सुरूच आहे. आधी गोपीनाथ मुंडेंच्या गडाला खिंडार पाडत भाजपचे पंडितअण्णा आणि धनंजय मुंडे राष्ट्रवादीच्या गळाला लागले. त्यानंतर शरद पवारांच्या पत्रकार परिषदेत नाट्यमय एंट्री करुन शिवसेनेचे खासदार आनंद परांजपेंनी ठाण्याच्या राजकारणाला कलाटणी दिली होती. ठाण्यातून राष्ट्रवादीचा हा झंझावात नारायण राणेंच्या कोकणात पोहचला. इथंही राष्ट्रवादीच्या घड्याळाचा अलार्म जोरदार वाजला. गेल्या रविवारी पुष्पसेन सावंत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. या एका मागून एक धक्क्यानंतर आणखी एक धक्का राष्ट्रवादी काँग्रेसनं काँग्रेसला दिलाय. हिंगोलीचे काँग्रेसचे माजी खासदार शिवाजीराव माने यांनी हाताची साथ सोडत राष्ट्रवादीचे घड्याळच हातावर बांधलंय.
 
 शिवाजी माने यांचा पक्ष प्रवेश
 

कोण आहेत हे माने?
 

First Published: Saturday, January 28, 2012, 16:05
First Published: Saturday, January 28, 2012, 16:05
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?