राज ठाकरेच ठरणार 'किंगमेकर' ?


www.24taas.com, मुंबई
 
येत्या महापालिका निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे किंगमेकरची भूमिका वठवतील. मुंबई पोलीस आणि राज्य गुप्तचर विभाग यांनी महापालिका निवडणुकीचा सर्व्हे रिपोर्ट तयार केला त्यात हे मांडण्यात आलं आहे.
 
या रिपोर्टनुसार शिवसेना-भाजप-रिपाई या महायुतीला मुंबईत साधारण ९२ ते १०० सीट, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला साधारण ८५ ते ९० सीट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला साधारण ३० सीट मिळतील असं नमूद करण्यात आलं आहे. हा रिपोर्ट मुंबईतल्या २२७ प्रभांगाचा बारिक अभ्यास, कोणत्या प्रभागात कोणत्या पक्षाचा उमेदवार उभा आहे तसच त्या उमेदवाराची ताकद किती आहे  आणि मतदाराचा कौल काय असेल याचा सारासार अभ्यास करुन तयार करण्यात आला आहे.
 
या रिपोर्टनुसार कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहूमत मिळणार नसुन मनसे सत्ता स्थापनेत महत्वाची भूमिका बजवेल. हा रिपोर्ट गृह खात्याला सोपवण्यात आल्याचं सुत्रांकडून सांगण्यात आलं. मुंबई पोलिसांच्या विशेष टीमने मुंबई महापालिकेचा आणि राज्य गुप्तचर विभागाने उर्वरित महापालिकांचा अभ्यास करुन हा रिपोर्ट तयार केला आहे.
 
 

First Published: Saturday, February 11, 2012, 15:33
First Published: Saturday, February 11, 2012, 15:33
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?