सत्तेसाठी राष्ट्रवादीला सुचले शहाणपण!


www.24taas.com, नवी दिल्ली
महापालिका आणि झेडपी निवडणुकीत एकमेकांची उणीदुणी काढल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला आता शहाणपण सुचलंय.... महापालिका आणि झेडपीच्या सत्तेसाठी ठिकठिकाणी काँग्रेसशी जुळवून घेण्याची तयारी राष्ट्रवादीनं केलीय...
 
मुंबई, ठाणे, नाशिक महापालिकेतील पराभव आणि जिल्हा परिषदेतील खालावलेल्या कामगिरीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसची आज दिल्लीत बैठक झाली. या बैठकीनंतर शरद पवारांनी काँग्रेसशी सत्तेसाठी जुळवून घेण्याचे संकेत दिले.
 
ज्या ठिकाणी सत्तेसाठी दोन्ही काँग्रेसना एकमेकांची गरज आहे तिथं एकमेकांशी चर्चा करून निर्णय घेऊ असं पवारांनी सांगितलं.... ज्या ठिकाणी दोन्ही पक्षांना अन्य पक्षांच्या पाठिंब्याची गरज असेल तिथं दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी चर्चा करून निर्णय घ्यावा असं पवारांनी सूचवलं आहे.
 
राष्ट्रवादीचा फटका काँग्रेसला बसला या पतंगराव कदम यांच्या वक्तव्यावर पवारांना विचारलं असता काही व्यक्तींचं म्हणणं गांभीर्यानं घ्यायचं नसतं असा टोला पवारांनी लगावला.

First Published: Monday, February 20, 2012, 21:02
First Published: Monday, February 20, 2012, 21:02
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?