www.24taas.com, झी मीडिया, मुंबईराहुल नार्वेकर यांनी अखेर अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
राहुल नार्वेकर यांनी आपली पक्षांतर्गत राजकारणात घुटमळ होत असल्याने, आपण जय महाराष्ट्र केला असल्याचं म्हटलं आहे.
राहुल नार्वेकर यांनी पक्ष प्रवेश केला तेव्हा, राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर शिवसैनिकांनी गर्दी केली होती, तसेच जोरदार घोषणाबाजीही शिवसेनेकडून करण्यात आली.
शिवसेना सोडतांना शिवबंधन बांधून घेण्याआधी विचार करायला हवा होता, मी १६ वर्षे पक्षाचं काम केल्याचं यावेळी राहुल नार्वेकरांनी सांगितलं.
आपण आपल्या भावना वेळोवेळी पक्ष नेतृत्वाकडे पोहोचवल्या असल्याचंही राहुल नार्वेकर यांनी म्हटलंय.
राहुल नार्वेकर हे राष्ट्रवादीत येणार असल्याचे संकेत शरद पवार यांनी दिले होते, राहुल नार्वेकर आपल्याला भेटले तेव्हा, ते फारच अस्वस्थ असल्याचं शरद पवारांनी सांगितलं होतं.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो
करा.
First Published: Monday, March 17, 2014, 17:27