राहुल नार्वेकरांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Last Updated: Monday, March 17, 2014, 17:27

राहुल नार्वेकर यांनी अखेर अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

राहुल नार्वेकरांनी घेतली शरद पवारांची भेट!

Last Updated: Sunday, March 16, 2014, 18:42

शिवसेनेच्या राहुल नार्वेकरांनी शरद पवारांची मुंबईतल्या निवासस्थानी भेट घेतलीय. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी नार्वेकर यांना शिवसेनेने उमेदवारी दिली होती. मात्र, नार्वेकरांनी विधान परिषदेच्या निवडणुकीतून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना अंधारात ठेवून माघार घेतली होती. त्यामुळं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही त्यांच्यावर नाराज आहे.

नार्वेकरांच्या माघारी : गोष्ट पडद्यामागची...

Last Updated: Friday, March 14, 2014, 10:45

शिवसेनेचे उमेदवार राहुल नार्वेकर यांनी ऐनवेळी विधान परिषद निवडणुकीतून माघार घेतल्यानं शिवसेनेला जबर धक्का बसलाय.

राहुल नार्वेकर करणार अखेरचा जय महाराष्ट्र?

Last Updated: Friday, March 14, 2014, 07:25

शिवसेनेच्या राहुल नार्वेकरांनी माघार घेतल्यामुळं विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध झाली आहे. मात्र, नार्वेकर यांनी शिवसेनेला जोरदार दे धक्का दिलाय. त्यांनी सेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादीची वाट धरली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेनेचे शिवबंधन धागा तुटला आहे.

सेनेच्या नार्वेकरांची माघार, विधान परिषद बिनविरोध

Last Updated: Thursday, March 13, 2014, 15:34

विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध झाली आहे. शिवसेनेच्या राहुल नार्वेकरांनी माघार घेतल्यामुळं निवडणुकीच्या रिंगणात ९ उमेदवार राहिल्यानं निवडणूक बिनविरोध झाली आहे. विधान परिषदेच्या नऊ जागा रिक्त झाल्या होत्या. मात्र यासाठी १० जणांचे अर्ज आल्यामुळं निवडणूक होणार होती. आता राहुल नार्वेकर यांनी माघार घेतल्यामुळं निवडणून बिनविरोध झाली असून घोडबाजारालाही चाप बसला आहे.