रायगडमधून राष्ट्रवादीचे सुनील तटकरे रिंगणात

रायगडमधून राष्ट्रवादीचे सुनील तटकरे रिंगणात
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांना रायगडमधून राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी तटकरेंच्या नावाची घोषणा केली. त्यामुळे रायगडमध्ये अनंत गीतेंची तटकरेंशी लढत रंगणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसनं जलसंपदामंत्री सुनील तटकरेंना राष्ट्रवादी रायगड लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर केलीय. प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी याबाबतची घोषणा केली. काँग्रेसकडे असलेला रायगडचा मतदारसंघ यंदा राष्ट्रवादी काँग्रेसनं बदलून घेतला होता. तेंव्हापासूनच तटकरे येथून निवडणूक लढवणार असल्याचा अंदाज होता.

आज भास्कर जाधव यांनी तशी घोषणा केलीय. आता रत्नागिरीचे खासदार अनंत गीते यांच्यासमोर तटकरेंचं आव्हान असेल.मात्र मावळ मतदारसंघातल्या उमेदवाराची घोषणा राष्ट्रवादीनं अद्याप केलेली नाही.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, March 13, 2014, 17:45
First Published: Thursday, March 13, 2014, 18:55
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?