www.24taas.com, वृत्तसंस्था, श्रीनगरआपल्याला जातीयवादी शक्तींपासून वाचवण्यासाठी देवाकडे प्रार्थना करा तरच आपण पुढे जाऊ शकू असं वक्तव्य फारुक अब्दुल्ला यांनी कश्मीर मधील प्रचारसभेत केलंय. भारत जातीयवादी होऊ शकत नाही तसे झाल्यास काश्मीर भारतात राहणार नाही असंही ते म्हणालेत. श्रीनगरमधील खन्यार इथं प्रचार सभेत बोलत होते.
यावेळी त्यांनी भाजप नेते गिरीराज सिंह आणि विश्वहिंदू परिषदेचे नेते प्रविण तोगडियायांवरही टीका केली. मोदींना मद देणाऱ्यांनी पाकिस्तानात द्यावे असं वक्तव्य करत मोदींना मत देणाऱ्यांनी समुद्रात बुडावे असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी यासभेत केलंय. त्यांच्या या वक्तव्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवलीये.
सोबतच काश्मीरमधील जनतेला जातीयवाद मान्य नाही, जर देश जातीयवादी बनला, तर काश्मिरी जनता भारतात राहणार नाही, असं खळबळजनक वक्तव्यही फारुख अब्दुल्ला यांनी केलं.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, April 28, 2014, 13:30