मोदींना मत देणाऱ्यांनी समुद्रात बुडावं- फारुख अब्दुल्ला

Last Updated: Monday, April 28, 2014, 16:33

आपल्याला जातीयवादी शक्तींपासून वाचवण्यासाठी देवाकडे प्रार्थना करा तरच आपण पुढे जाऊ शकू असं वक्तव्य फारुक अब्दुल्ला यांनी कश्मीर मधील प्रचारसभेत केलंय. भारत जातीयवादी होऊ शकत नाही तसे झाल्यास काश्मीर भारतात राहणार नाही असंही ते म्हणालेत. श्रीनगरमधील खन्यार इथं प्रचार सभेत बोलत होते.

अतिरेकी हल्ल्यात दोन भारतीय जवान शहीद

Last Updated: Thursday, November 7, 2013, 20:47

श्रीनगरमध्ये पुन्हा अतिरेक्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाला टार्गेट केले. अतिरेक्यांनी केलेल्या हल्यात दोन जवान शहीद झाले. गस्तीवर असलेल्या पोलीस दलावर हा हल्ला करण्यात आला.

काश्मीरमध्ये तब्बल ४० दहशतवादी घुसलेत

Last Updated: Thursday, October 3, 2013, 14:16

काश्मीरच्या केरन सेक्टरमध्ये एका गावात तब्बल ४० दहशतवादी घुसलेत.त्यांच्याशी आर्मीचा गेल्या १० दिवसांपासून संघर्ष सुरू आहे. दहशतवादी आणि आर्मी यांच्यात जोरदार गोळीबार सुरू आहे. आज चकमकीचा दहावा दिवस आहे.

श्रीनगरमधील अतिरेकी हल्ल्यात ५ पोलीस जखमी

Last Updated: Thursday, October 3, 2013, 10:17

श्रीनगर शहरातील सौरामधील अहमदनगर भागत दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत पाच पोलीस जखमी झाले आहेत. या भागात अतिरेकी घुसल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी या भागाल घेरले. याचवेळी अतिरेक्यांनी बॉम्बहल्ला केला.

श्रीनगरमध्ये लष्कराच्या ताफ्यावर अतिरेकी हल्ला, एक जखमी

Last Updated: Saturday, September 28, 2013, 15:03

श्रीनगरच्या संतनगरमध्ये गोळीबार करण्यात आला आहे. हा हल्ला लष्कराच्या ताफ्यावर करण्यात आला आहे. या गोळीबारात एकजण जखमी झाला आहे. संपूर्ण परिसराला सैन्याने घातला वेढा असून अतिरेकी लपल्याची शक्यता वर्तविण्यात आला आहे.

काश्मिरी भारतीय नाहीत का? - ओमर अब्दुल्ला

Last Updated: Friday, August 16, 2013, 09:47

काश्मिरी नागरिकांकडे ते जणू भारतीय नाहीतच याच नजरेने पाहिले जाते. त्यांना देशाच्या नागरिकांपेक्षा वेगळीच वागणूक दिली जात आहे, असा अजब दावा करत जम्मू-कश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी जम्मू-काश्मीरवर अन्याय होत असल्याचा आरोपच केला.

सुरक्षा गार्ड एटीएम मशीन फोडतो तेव्हा...

Last Updated: Thursday, July 18, 2013, 11:35

कुंपनाचे शेत खात तर असेल तर करायचं काय? अशी म्हण प्रचलित आहे. हीच बाब भारतीय स्टेट बॅंकेच्याबाबतीत घडलेय. या बॅंकेच्या एटीएम मशीनसाठी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आला होता. याच सुरक्षा रक्षकाने एटीएम मशीन तोडून २३ लाखांवर डल्ला मारला.

दहशतवादी हल्ल्यानंतरही पंतप्रधान-सोनिया काश्मीर दौऱ्यावर

Last Updated: Tuesday, June 25, 2013, 10:31

पंतप्रधान मनमोहन सिंह आणि सोनिया गांधी आज जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. श्रीनगरमध्ये हिजबुल मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांनी काल केलेल्या हल्ल्यात आठ जवान शहीद झाले होते.

श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला, ४ जवान शहीद

Last Updated: Monday, June 24, 2013, 18:14

श्रीनगरच्या हैदरपुरा भागात लष्कराच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची वृत्त आहे. दहशतवाद्यांच्या या हल्ल्यात चार जवान शहीद तर सात जवान जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. हिजबुल मुज्जाहिद्दीन यांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

दहशतवादी पाकिस्तानी असल्याचा संशय- सुशीलकुमार

Last Updated: Thursday, March 14, 2013, 13:47

दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या पाच जवानांना श्रद्धांजलीवेळी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे गैरहजर असल्यामुळं विरोधकांनी सभागृहात जोरदार गोंधळ घातला.

श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला; ५ जवान शहीद

Last Updated: Wednesday, March 13, 2013, 13:01

श्रीनगरमध्ये दहशदवाद्यांनी हल्ला केला आहे. बिमना परिसरातल्या शाळेबाहेर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे पाच जवान शहीद झाले आहेत.

फेसबुकवरून 'प्रगाश'ला धमकावणाऱ्या तीन जणांना अटक

Last Updated: Thursday, February 7, 2013, 12:00

काश्मीरमधला मुलींचा पहिला रॉक बॅन्ड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘प्रगाश’ बॅन्डमधील मुलींबद्दल ऑनलाईन अपशब्द वापरणाऱ्या आणि धमकी देणाऱ्या तीन तरुणांना पोलिसांनी अटक केलीय.

सुट्टी न मिळाल्यानं तणावग्रस्त जवानाची आत्महत्या

Last Updated: Wednesday, January 30, 2013, 16:09

बारामुल्ला जिल्ह्याच्या सीमांत क्षेत्रात तैनात असलेल्या सैन्याच्या एका जवानाने सोमवारी आपल्या सर्व्हिस रायफलनं स्वत:ला गोळी मारुन आत्महत्या केलीय.

अमरनाथ यात्रेसाठी दुसरा जत्था रवाना

Last Updated: Wednesday, June 27, 2012, 07:44

लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या अमरनाथ यात्रेला सोमवारपासून सुरुवात झालीय. या यात्रेसाठी निघालेला पहिला जत्था मार्गावर असताना भक्तांचा दुसरा जत्था रवाना झालाय.

अमरनाथ यात्रेत पावसाचा व्यत्यय

Last Updated: Monday, June 25, 2012, 16:32

अमरनाथ यात्रेला आज सोमवारपासून सुरूवात झाली असली तरी पावसाचा जोर वाढल्याने यात्रेत अडथळा निर्माण झाला आहे. हजारो यात्रेकरूंना बालताल येथून तीन किलोमीटर असलेल्या डूमेल येथे ऱोखण्यात आले आहेत.

लेहमध्ये भूस्खलन, ४०० पर्यटक फसले

Last Updated: Saturday, June 9, 2012, 15:23

श्रीनगरमधील 'खारदुंग ला'तील लेह-नुब्रा व्हॅलीच्या मार्गावर १० किलोमीटरचे क्षेत्र भूस्खलनामुळे धोक्यात आले आहे. भूस्खलनामुळे १५० वाहनांसह ४०० लोक फसले गेले आहेत. फसलेल्या पर्यटकांना बाहेर काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

अफझल गुरूवरुन राडा सुरूच !

Last Updated: Sunday, October 9, 2011, 12:57

संसदेवरील हल्ल्यातील दोषी अफझल गुरू याची फाशी रद्दव्हावी , यासाठी जम्मू - काश्मीरविधानसभेत मांडण्यात आलेला ठराव बुधवारी कॉंग्रेस आणि भाजप सदस्यांच्या गोंधळात रद्द झाला त्यामुळे विधानसभेचे कामकाज पूर्ण दिवसासाठी तहकूब करण्यात आले.