370 कलमवरील खुल्या चर्चेवरून राजकीय संघर्ष

Last Updated: Wednesday, May 28, 2014, 11:20

कलम 370 वरून पंतप्रधान कार्यालय विरूद्ध जम्मू काश्मीर सरकार असा संघर्ष सुरू झालाय.

काश्मीरमध्ये ‘मिग-21’ला अपघात, पायलटचा मृत्यू

Last Updated: Tuesday, May 27, 2014, 15:24

श्रीनगरच्या अनंतनागमधल्या मधमासंगम परिसरात एअर फोर्सचं मिग-21 विमान दुर्घटनाग्रस्त झालंय. त्यात पायलटचा मृत्यू झालाय. मृत पायलटचं नाव रघू बन्सी हे आहे. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या ट्विट करुन दुर्घटनेच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला.

एक्झिट पोल म्हणजे टाईमपास - ओमर अब्दुल्ला

Last Updated: Tuesday, May 13, 2014, 15:17

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी लोकसभा निवडणुकीच्या विविध एक्झिट पोलनं केलेली भविष्यवाणी ‘टाईमपास’ असल्याचं म्हटलंय.

हेरगिरी प्रकरणावरून यूपीएत फूट, NCPचा मोदींना पाठिंबा

Last Updated: Sunday, May 4, 2014, 19:19

नरेंद्र मोदींवर टीका करणारी राष्ट्रवादी काँग्रेस चक्क मोदींची पाठराखण करतेय. गुजरातमधील महिला हेरगिरीप्रकरणी चौकशीसाठी न्यायमूर्तींची नियुक्ती करण्यास यूपीएतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सनं विरोध केला आहे.

मोदींकडे काश्मीरमध्ये येण्याचं धैर्य नाही-ओमर

Last Updated: Tuesday, April 29, 2014, 13:01

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि ओमर अब्दुल्ला यांच्यातील खडाखडी संपण्याचं नाव घेत नाहीय.

मोदींना मत देणाऱ्यांनी समुद्रात बुडावं- फारुख अब्दुल्ला

Last Updated: Monday, April 28, 2014, 16:33

आपल्याला जातीयवादी शक्तींपासून वाचवण्यासाठी देवाकडे प्रार्थना करा तरच आपण पुढे जाऊ शकू असं वक्तव्य फारुक अब्दुल्ला यांनी कश्मीर मधील प्रचारसभेत केलंय. भारत जातीयवादी होऊ शकत नाही तसे झाल्यास काश्मीर भारतात राहणार नाही असंही ते म्हणालेत. श्रीनगरमधील खन्यार इथं प्रचार सभेत बोलत होते.

मोदींची लोकप्रियता वाढत आहे- ओमर अब्दुल्ला

Last Updated: Monday, November 4, 2013, 18:57

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दूल्ला यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केलाय. मात्र नरेंद्र मोदींची लोकप्रियता नाकारता येणार नाही, असं ओमर अब्दुल्लांना कबुल करावं लागलं आहे.

काश्मिरी भारतीय नाहीत का? - ओमर अब्दुल्ला

Last Updated: Friday, August 16, 2013, 09:47

काश्मिरी नागरिकांकडे ते जणू भारतीय नाहीतच याच नजरेने पाहिले जाते. त्यांना देशाच्या नागरिकांपेक्षा वेगळीच वागणूक दिली जात आहे, असा अजब दावा करत जम्मू-कश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी जम्मू-काश्मीरवर अन्याय होत असल्याचा आरोपच केला.

काश्मिर कोणाच्या मालकीचं नाही – जेटली

Last Updated: Monday, August 12, 2013, 22:44

जम्मू-काश्मिरमध्ये सुरू असलेल्या जातीय दंगलींवरून राजकारण सुरू झालंय. राज्य सरकारनं केवळ बघ्याची भूमिका घेत दंगली भडकू दिल्याचा आरोप भाजपनं मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांवर केलाय.

संसदेत किश्तवाड हिंसाचाराचे पडसाद!

Last Updated: Monday, August 12, 2013, 16:02

काश्मीरमधल्या किश्तवाड हिंसाचाराचे पडसाद संसदेत उमटलेत. राज्यसभेत विरोधी पक्षनेते अरूण जेटली यांना आधी बोलू देण्यावरून सरकारी बाकांवरून गोंधळ घातला गेला. त्यामुळे कामकाज तहकूब करावं लागलं.

रसूलला संधी न दिल्यानं ओमर अब्दुल्ला नाराज

Last Updated: Sunday, August 4, 2013, 16:07

भारतीय क्रिकेट टीममध्ये स्थान मिळवणारा जम्मू-काश्मीरचा पहिला क्रिकेटर परवेज रसूल याला झिम्बाव्वे दौऱ्यात संधी न मिळाल्यानं मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला चांगलेच नाराज झालेत.

`ये जवानी है दिवानी`वर काश्मिरचे मुख्यमंत्री संतापले!

Last Updated: Sunday, June 2, 2013, 16:57

जम्मू काश्मिरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला `ये जवानी है दिवानी` सिनेमावर नाराज झाले आहेत. ट्विटरवर त्यांनी या सिनेमाला चांगलंच धारेवर धरलं आहे.

अब्दुल्लांनी मागितली सनाउल्लाहच्या कुटुंबीयांची माफी

Last Updated: Thursday, May 9, 2013, 15:52

जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी मृत पाकिस्तानी कैदी सनाउल्लाह रंजय याच्या कुटुंबीयांची माफी मागितलीय. चंदीगडच्या एका हॉस्पीटलमध्ये सनाउल्लाहनं आज अखेरचा श्वास घेतला.

...अन् भर विधानसभेत मुख्यमंत्र्यांना रडू कोसळंल!

Last Updated: Wednesday, March 6, 2013, 15:54

आज जम्मू-काश्मीर विधानसभेत मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरले. भर सभेत जवळजवळ एका मिनिटापर्यंत आपला चेहरा आपल्या दोन्ही हातांत घेऊन ते हुंदके देत राहिले.

`गुरुच्या फाशीमुळे काश्मिरी तरुणांत अन्यायाची भावना`

Last Updated: Sunday, February 10, 2013, 21:06

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी अफजल गुरुच्या फाशीवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केलीय. या फाशीमुळे खोऱ्यातील तरुणांच्या एका पिढीत अन्यायाची भावना निर्माण होईल, असं त्यांनी म्हटलंय.

रॉक बँण्ड : तरूणींना धमकी तक्रार दाखल

Last Updated: Wednesday, February 6, 2013, 08:48

काश्मिरातल्या मुलींच्या रॉक बॅण्डला धमकी देणाऱ्यां विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. श्रीनगरच्या राजबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काश्मिरी मुलींचा बॅण्ड बंद करण्याचा फतवा

Last Updated: Monday, February 4, 2013, 16:05

काश्मिरमध्ये मुलींनी हटके रॉकिंग बॅण्डची स्थापना केली. मात्र, ही संकल्पना अनेकांच्या डोळ्यात खूपलेय. हा बॅण्ड बंद करण्याचा फतवा मुस्लिम संघटनांनी काढलाय. बॅण्डमधून भीतीपोटी तीन मुली बाहेर पडल्यात.