कार्यक्रम पालिकेचा, चेहरामोहरा सेनेचा - Marathi News 24taas.com

कार्यक्रम पालिकेचा, चेहरामोहरा सेनेचा


महादेव शेलार,  काँग्रेस नेते
 
कार्यक्रम पालिकेचा, चेहरामोहरा सेनेचा, असचं सध्या मुंबईत दिसून येत आहे. याला काय म्हणायचे ?  आता इलेक्शन फेब्रुवारी २०१२मध्ये आलयं, म्हणून हा उद्धाटनाचा सपाटा सुरू झाला आहे. सत्ता शिवसेनेची. पाच वर्षे हे झोपले होते का ?
 
जाहिरनाम्यामध्ये दिलेली वचने आणि आश्वासने आम्ही पुरी केलीत, असे म्हणारे हे, कचरा शून्य करु हे त्यांच्या जाहिरनाम्यात होतं, नव्हे तसं ते  जाहिरनाम्यात म्हणत होते. आता इलेक्शन जवळ आल्याने महापौर, स्थायी समितीचे चेरमन हे अधिकाऱ्यांना घेऊन फिरतात. आता सांगा,  झाला का हा कचरा शून्य. चांगल्या जलवाहिन्या टाकण्याचं सांगितलं होतं. त्याचं काय झालं ?
 
उच्च दाबाने पाणीपुरवठा करण्याचं आणि शुध्द पाणी देण्याचं आश्वासन शिवसेनेने दिलं होतं. शुध्द पाणी दिलं का ? १०० वर्षांपूर्वीची पाइपलाइन बदलून नव्या जलवाहिन्या टाकण्याचं सांगितलं. आता सांगा, शिवसेनेची १९८५सालापासून सत्ता आहे. कामाच्या नावाखाली निवळ कंत्राटदार नेमायचे, त्याच्याव्यतिरिक्त शिवसेनेचा दुसरा उद्योग नाही. यातून वेगळा फायदा करायचा. हे पूर्णपणे चुकीचं आहे.
 
प्रकल्प कोणाचा, कार्यक्रम कोणाचा ?  तर तो मुंबई महापालिकेचा. त्याला चेहरामोहरा कसा असतो सेनेचा.  कार्यक्रमात झेंडे सेनेचे असतात. कार्यक्रमाचे उद्धाटन उद्धव ठाकरे करतात.  स्वत:च्या फायद्यासाठी हे सर्व होत आहे. शिवसेनेने कामांच्या उद्धाटन कार्यक्रमांचा जो काही धुमधडाका लावला, तो मुंबई महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्याने आहे.  हे सर्व चालले आहे, ते पॉलिटीकल मायलेजसाठी ! गैरफायदा घेत पॉलिटीकल मायलेजसाठी शिवसेनेचा उद्योग चालला आहे, हे चुकीचं आहे.
 
आयुक्तांनी काढलेलं सरक्युलर बरोबर आहे. कार्यक्रम मुंबई महापालिकेचा. श्रेय शिवसेनेनं लाटायचं, हे बरोबर नाही. ५ वर्षे  सत्तेत शिवसेना आहे. १९६८ पासून (यात १९९२-९६ चा अपवाद वगळता) सत्ता त्यांच्याकडे असताना काय विकास केला. विकासासाठी किती निधी दिला ? केवळ मुंबईला नागू करण्याचं काम सेनेनं केलयं.
 
आयुक्तांनी नियमानुसार सरक्युलर काढलं आहे. त्याला विरोध करणं चुकीचं आहे. कार्यक्रम पालिकेचा असताना भगवे झेंडे लावून श्रेय लाटायचे कशाला?  यांनी स्वत:चं  श्रेय लाटायचं आणि खर्च पालिकेनं करायचं. हे कुठे तरी थांबले पाहिजे. याच्यासाठी आचारसंहिता हवी. सरकारचा तसेच जनतेचा हा पैसा आहे. त्याचा चांगल्या कामांवर उपयोग झाला पाहिजे. सत्तेचा गैरफायदा घेत पक्षाच्या कार्यक्रमासाठी शिवसेना पालिका पर्यायाने जनतेच्या पैशाचा दुरूपयोग करीत होती.  त्यामुळं आयुक्तांनी नियमानुसार सरक्युलर काढलं आहे. त्याचं स्वागत करीत आहोत.
 
शब्दांकन - सुरेंद्र गांगण
 
 
 
 

 
 
 

First Published: Wednesday, October 26, 2011, 08:34


comments powered by Disqus