Last Updated: Thursday, December 20, 2012, 11:30
www.24taas.com, अहमदाबादगुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाला २/3 असे स्पष्ट बहुमत मिळेल आणि पुन्हा मोदीच सत्तेत येतील, असा दावा माजी गृहराज्य मंत्री आणि नरेंद्र मोदींचे समर्थक अमित शाह यांनी केला आहे.
भाजप पुन्हा सत्तेत येणार याबाबत कोणतेही दुमत नाही. भाजप सलग तिसऱ्यांदा पुन्हा सत्तेत बसेल. या सत्तेचे नेतृत्व नरेंद्र मोदीच करणार यात कोणाचे दुमत नाही, असे अमित शाह यांनी सांगितले.
सार्वत्रिक निवडणुकीत गुजरातमध्ये भाजप २/३ असे स्पष्ट बहुमत मिळवून सत्ता काबिज करेल, असा विश्वास अमित शाह यांनी केला आहे. सलग दोन वेळा भाजपने निवडणुका जिंकत सत्ता टिकवून ठेवली. दरम्यान, मतदान मोजणीला सुरूवात झाल्यानंतर नरेंद्र मोदींच्या पक्षाने आघाडी घेतली आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे.
First Published: Thursday, December 20, 2012, 09:14