गुजरातमध्ये मुख्यमंत्री नरेंद्र मोदी विजयी , Gujarat elections 2012, Narendra Modi,

गुजरातमध्ये मुख्यमंत्री नरेंद्र मोदी विजयी

गुजरातमध्ये मुख्यमंत्री नरेंद्र मोदी विजयी
www.24taas.com, अहमदाबाद

गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाने निवडणूक निकालामध्ये आघाडी घेतली असताना मणिनगरमधून मुख्यमंत्री नरेंद्र मोदी विजयी झाले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. सलग तिसऱ्यांदा मोदी विजयी झाले आहेत.

निवडणूक निकालामध्ये भाजप ११६ तर काँग्रेस ६३ जागांवर पुढे आहे. त्यामुळे पुन्हा भाजपचे सरकार येणार हे जवळपास निश्चित झाले आहे. गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाला २/3 असे स्पष्ट बहुमत मिळेल आणि पुन्हा मोदीच सत्तेत येतील, असा दावा माजी गृहराज्य मंत्री आणि नरेंद्र मोदींचे समर्थक अमित शाह यांनी केला आहे. हा दावा आता ११६ जागांवर घेतलेल्या आघाडीमुळे स्पष्ट झाला आहे.

कसकाळी ९.२० वाजता गुजरातमध्ये १०० जागांचे निकाल हाती आले त्यावेळी काँग्रेस ३५ जागांवर आघाडीवर तर भाजप ६७ जागांवर आघाडीवर होता. तर लक्षवेधी असलेल्या मणिनगरमधून नरेंद्र मोदी ८००० पेक्षा जास्त मतांनी आघाडीवर होते. तर विसावदरमधून केशूभाई पटेल आघाडी घेतली होती. तसेच नारणपुरामधून अमित शहा यांनीही आघाडी घेतली होती.

First Published: Thursday, December 20, 2012, 11:05


comments powered by Disqus