Last Updated: Wednesday, December 26, 2012, 17:32
www.24taas.com, अहमदाबादगुजरात भाजपचे सर्वेसर्वा नरेंद्र मोदी यांनी आज चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांनी गुजराती भाषेतून शपथ घेतली.
अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये मोठ्या जनसमुदायसमोर मोदींनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मोदींच्या शपथविधी सोहळ्याला महाराष्ट्रातील दिग्गजनेते उपस्थित होते. नरेंद्र मोदी यांची आई हिरा बा यांची खास उपस्थिती होती.
मोदींच्या शपथविधी उपस्थिती सोहळ्यामध्ये भाजप अध्यक्ष नितीन गडकरी, ज्येष्ठनेते लालकृष्ण अडवाणी, विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज, अण्णा द्रमुकच्या जयललिता, महाराष्ट्रातून राज ठाकरेंसोबत पत्नी शर्मिला ठाकरे आणि पुत्र अमित तर उद्धव यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, मिलिंद नार्वेकर, खासदार अनंत गिते, भाजप नेते गोपीनाथ मुंडे, आरपीआय नेते रामदास आठवले यांचा समावेश आहे. तसेच उदयोगपती सुब्रतो राय , भाजपच्या मित्रपक्षांचे नेते, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते.
राज्यपाल कमला बेनीवाल यांनी नरेंद्र मोदी यांना गोपनीयतेची शपथ दिली. मोदी यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेटचे सात तर राज्यमंत्री म्हणून नऊ जणांनी यावेळी शपथ घेतली.
First Published: Wednesday, December 26, 2012, 12:34