राज ठाकरे कुटुंबीयांसह गुजरातला रवाना, raj thakeray attend the oath ceremony of narendra modi

राज ठाकरे कुटुंबीयांसह गुजरातला रवाना

राज ठाकरे कुटुंबीयांसह गुजरातला रवाना
www.24taas.com, मुंबई

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे अहमदाबादला रवाना झालेत. मोदी यांच्या शपथविधीसाठी त्यांनाही निमंत्रण मिळालंय.

राज ठाकरे यांच्यासोबत पत्नी शर्मिला ठाकरे आणि पुत्र अमित हेही आहेत. सकाळी सातच्या सुमारास राज दादरच्या त्यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानाहून गुजरातकडे रवाना झाले. अहमदाबादमधील सरदार पटेल स्टेडियमवर शपथविधी पार पडणार आहे.

गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून चौथ्या वेळेस नरेंद्र मोदी येथील सरदार पटेल स्टेडियमवर आज सकाळी ११ वाजता शपथ घेणार आहेत. गुजरात विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळविल्यानंतर मोदी यांनी सरकार स्थापनेचा दावा केला आहे. यासाठी राज्यपाल डॉ. कमला बेनिवाल यांची त्यांनी भेट घेतली. मोदींच्या शपथविधीसाठी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी, पक्षाध्यक्ष नितीन गडकरी, सुषमा स्वराज, अरुण जेटली, माजी पक्षाध्यक्ष वेंकय्या नायडू, डॉ. मुरलीमनोहर जोशी, राजनाथसिंह आदी सहभागी होणार आहेत. भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्रीही आणि मित्रपक्षांचेही नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

First Published: Wednesday, December 26, 2012, 08:08


comments powered by Disqus