सावधान, तणावामुळे होते आयुष्य कमी, LIFE END, AFTER STRESS

सावधान, तणावामुळे होते आयुष्य कमी

सावधान, तणावामुळे होते आयुष्य कमी
www.24taas.com, झी मीडिया, लंडन

तुम्ही तणावग्रस्त आहात का? तर, हे वाचा आणि विचार करा.. कदाचित हाच तणाव तु्मच्या आजारपणाला तर कारणीभुत नाही ना? होय, लंडनमध्ये झालेल्या एका संशोधनांतर्गत हे सिद्ध झालय की तुम्ही जितका ताण घेणार त्याचा सरळ परिणाम तुमच्या शरीरावर होतो.

संशोधकांच्या मते, माणूस जितका तणाव घेणार त्याचा सरळ परिणाम त्याच्या शरीरावर होऊन तो आजारी पडू शकतो. सर्वात प्रथम `डेली मेल’ या वृत्तपत्रानुसार हृदयासंबंधीचे रोग आणि माणसाची विचारशक्ती यामध्ये संबंध असल्याचे समोर आले आहे.

संशोधकांच्या म्हणण्यानुसार डॉक्टरांनी तणावाबद्दल तक्रार घेऊन येणाऱ्या प्रत्येक रुग्णाच्या विचार शक्तिचीही चाचणी केली पाहिजे. रुग्णाच्या डोक्यात आणि मनात चालणाऱ्या विचारांवर जर लक्ष केंद्रित केल तर बऱ्याच प्रमाणात हृदय विकारासारखे रोग टाळले जाऊ शकतात.

संशोधकांनी त्यांच्या संशोधनादरम्यान ४९ ते ५० या वयोगटातील लोकांना विचारले की, ते त्यांच्या रोजच्या कामात आणि दिनक्रमात कोणकोणत्या गोष्टींचा, कशाप्रकारे विचार करतात आणि त्यानंतर त्यांना कसे वाटते. याव्यतिरिक्त त्यांच्या जीवनशैलीबद्दलही त्यांना प्रश्न केले गेले आणि त्यामध्ये त्यांचे खाणे–पिणे, व्यायाम, दारू आणि सिगारेट या गोष्टींचाही प्रभाव पडतो.

माणसाच्या विचारशक्तीचा परिणाम त्याच्या शरीरावरही होत असतो, यामुळे त्याला हृदय विकाराचे झटके येण्याचीही शक्यता असते, असं फ्रान्सच्या विल्लेजुइफमधील इंसर्म मेडिकल रिसर्च इन्स्टिट्युटच्या हर्मन्न नाबी यांनी म्हटले आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, June 27, 2013, 19:48


comments powered by Disqus