Last Updated: Friday, August 17, 2012, 12:44
www.24taas.com, लंडनलंडनमध्ये केल्या गेलेल्या एका नव्या अभ्यासानुसार आपण मध्यमवयातही शरीराला थोडा ताण देऊन हलका-फुल्का व्यायाम केला तरी त्याचा मोठा फायदा आपल्या ह्रद्याला होऊ शकतो.
आठवड्यातील फक्त अडीच घंटे व्यायामासाठी द्या, हा डॉक्टरांचा सल्ला मानून त्याची अंमलबाजावणी करणाऱ्या काही लोकांचा अभ्यास लंडन युनिव्हर्सिटीच्या अभ्यासकांनी केला. यामध्ये अशा व्यक्तींच्या रक्तात ह्रदयाला हानी पोहचवाणाऱ्या तत्त्वांचं प्रमाण खूपच कमी होतं. ‘बीबीसी न्यूज’ रिपोर्टमध्येही या वृत्ताला दुजोरा दिला गेलाय. ४० ते ६० वयोमानाच्या व्यक्तींनी हलका व्यायाम केला तरी त्याच्या ह्रद्याला मात्र त्याचा मोठा फायदा होतो, असं बीबीसीनं म्हटलंय.
४००० पेक्षा जास्त व्यक्तींवर हा अभ्यास करण्यात आलाय. ज्या लोकांनी हा सल्ला मानून हलक्या-फुलका व्यायाम केला त्या लोकांना निश्चितच त्याचा फायदा झाल्याचं या अभ्यासात स्पष्ट झालंय.
First Published: Friday, August 17, 2012, 12:44