कंडोम वापरात घट, लोकांकडे अन्य पर्याय, Low condom use

कंडोम वापरात घट, लोकांकडे अन्य पर्याय

कंडोम वापरात घट, लोकांकडे अन्य पर्याय
www.24taas.com, नवी दिल्ली

कंडोमचा वापर करण्याबाबत कमालीची घट झाली आहे. मात्र, कुटुंब नियोजनासाठी अन्य पर्यांचा वापर होताना दिसत आहे. ही बाब कंडोम विक्रीत झालेल्या घसरीवरून दिसून आलेय.

देशात कंडोमचा वापर कमी झाला असून वर्षभरात मोफत कंडोमच्या उपयोगकर्त्यात १५ टक्के तर खरेदी करून वापरणार्यांपच्या संख्येत १० टक्क्यांची घट नोंदवली गेली आहे. लोक कुटुंब नियोजनाच्या इतर पर्यायांकडे आकर्षित होत असल्याचे स्पष्ट होत आहे. तज्ज्ञांच्या मते कुटुंब नियोजनाचे सोपे उपाय उपलब्ध असल्याने कंडोमचा उपयोग कमी झाला आहे.

कंडोम वापर जास्तीत जास्त व्हावा, यासाठी आरोग्य मंत्रालय प्रचार आणि प्रसाराचे नवीन धोरण आखत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या एचएमआयएसने एकत्रित केलेल्या आकडेवारीतून २०१०-२०११ मध्ये मध्य प्रदेशात सुमारे ४० टक्के लोकांनी कंडोमला सोडचिठ्ठी दिलीये. तर हरियाणात कंडोम उपयोगकर्त्यांच्या संख्येत ३०, महाराष्ट्रात २५, झारखंडमध्ये २४, गुजरातमध्ये १७ आणि उत्तर प्रदेशात १२ टक्क्यांची घट झाली आहे.

First Published: Wednesday, April 10, 2013, 16:25


comments powered by Disqus