सकाळच्या मोकळ्या हवेत फेरफटका मारून तरी बघा!, morning walk avoid many diseases

सकाळच्या मोकळ्या हवेत फेरफटका मारून तरी बघा!

सकाळच्या मोकळ्या हवेत फेरफटका मारून तरी बघा!

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

नियमित थोड्या वेळ का होईना पण मोकळ्या हवेत मारलेला फेरफटका प्रत्येकाच्या स्वास्थ्यासाठी फायदेशीर ठरतं. परंतु, भारतीय मात्र प्रतिदिन ३० मिनिटांपेक्षाही कमी वेळ सकाळच्या मोकळ्या फेरफटका मारतात, असं नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात स्पष्ट झालंय.

`वर्ल्ड हर्ट फेडरेशन`तर्फे केलेल्या इंटरनेट आधारित एका आंतराष्ट्रीय बाजार संशोधन कंपनी, यूगोवनं केलेल्या ऑनलाईन केलेल्या या सर्वेक्षणात याचा खुलासा करण्यात आलाय.

‘पब्लिक हेल्थ फाऊंडेशन इन इंडिया’च्या संचालक (स्वास्थ्य प्रचार) मोनिका अरोडा यांनी यांच्या म्हणण्यानुसार, याआधी झालेल्या संशोधनांनुसार भारतीय लोकांना नियमित मारलेला फेरफटका हृदयाशी संलग्न असलेल्या धोक्यांपासून लांब ठेवत होता. स्वस्थ तसंच तणावरहीत राहण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला रोज कमीत कमी ३० मिनिटांपर्यंत तरी थोडं तेज गतीनं चालणं गरजेचं आहे. सर्वेक्षणाच्या अभ्यासानुसार, १८-२४ वयोमानातील तरुण इतर वयोगटातील व्यक्तींपेक्षा जास्त वेळ फेरपटका मारतात.


सर्व्हेक्षणात १८ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या १०२१ लोकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये निघालेल्या निष्कर्षानुसार यामध्ये सहभाग घेणाऱ्यांपैकी ४६ टक्के लोकांनी निर्धारित केलेल्या दिवसांमध्ये अर्धा तासांपेक्षाही कमी वेळ फेरफटका घालवण्यासाठी वापरला होता.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, October 2, 2013, 08:05


comments powered by Disqus