Last Updated: Friday, February 14, 2014, 16:06
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईप्रकृतीशी संबंधीत समस्यांचे आणि मोबाईल फोनचा काही संबंध नसल्याचा मोठा खुलासा मोबाईल टेलीकम्युनिकेशन अँड हेल्थ रिसर्च (एमटीएचआर) च्या संशोधनात करण्यात आला आहे. या संदर्भात सादर करण्यात आलेल्या अहवालात म्हटले आहे की, मोबाईल फोनच्या वापरामुळे तुमच्या प्रकृतीला कोणताही धोका नसतो. या संदर्भात ११ वर्ष संशोधन करण्यात आले आहे.
एमटीएचआरने जेव्हा संशोधन सुरू केले तेव्हा मोबाईल आणि त्याच्या तंत्रज्ञानासंबंधी लोकांमध्ये खूप गैरसमज होते. हा कार्यक्रम आता स्वतंत्रपणे पूर्ण करण्यात आला असल्याचे एमटीएचआरचे चेअरमन डेव्हिड कोगोन यांनी सांगितले. मोबाईल फोन आणि त्याच्या बेस स्टेशनातून निघणाऱ्या रेडिओ लहरीमुळे कोणता परिणाम होत नसल्याचे या व्यापक संशोधनात समोर आले आहे.
आधुनिक दूरसंचार यंत्रणेतील सुरक्षा चांगली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. जी मुले विद्युत प्रवाहाच्या जवळपास किंवा खाली राहतात त्यांना ल्युकेमिया आजाराचा धोका नाही. ११ वर्षे सुरू असलेल्या कार्यक्रमात १३.६ मिलियन डॉलर इतका खर्च आला. ही रक्कम युनायटेड किंगडम आणि टेलिकम्युनिकेशन इंडस्ट्रीने संयुक्तरित्या दिली आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, February 14, 2014, 16:06