आजार टाळण्यासाठी रेड वाईन, डार्क चॉकलेट खाताय? थांबा, red wine, dark choklet is not that much useful

आजार टाळण्यासाठी रेड वाईन, डार्क चॉकलेट खाताय? थांबा...

आजार टाळण्यासाठी रेड वाईन, डार्क चॉकलेट खाताय? थांबा...

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

रेड वाईन, डार्क चॉकलेट आणि बेरींमधील अँटिऑक्सिडंट हे हृदयविकार किंवा कर्करोगही रोखण्याइतके सक्षम असल्याचं म्हटलं जातं होतं.... मात्र, आता एका नव्या संशोधनात या पदार्थांमध्ये असणारी क्षमता हृदयरोग आणि कर्करोग रोखण्यासाठी अपुरी ठरत असल्याचं समोर आलंय.

बाल्टीमोरमधील हॉपकिंस युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसीनच्या संशोधकांनी याबाबत अधिक संशोधन केलंय. रिर्चड सेम्बा यांनी याबाबतची माहिती दिली. `काही पदार्थ खाल्ल्यामुळे तात्काल योग्य तो परिणाम होतो असं नाही. या पदार्थांमधील घटक काही गंभीर आजारांना रोखण्यासाठी पुरेसे असतातच असंही नाही` असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय.

या संशोधनासाठी आहारात नियमितपणे डॉर्क चॉकलेट, बेरी आणि रेड वाईनचा समावेश असलेल्या 783 इटालियन लोकांची पाहणी करण्यात आली. मात्र अशा लोकांपैकीही काहींना ह्रदयविकार व कर्करोग झाल्याचे कालांतराने निष्पन्न झालं. त्यामुळे सर्वच लोकांना अशा पदार्थांचा लाभ मिळत नाही हे उघड झालंय.



* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, May 25, 2014, 07:39


comments powered by Disqus