आजार टाळण्यासाठी रेड वाईन, डार्क चॉकलेट खाताय? थांबा...

Last Updated: Sunday, May 25, 2014, 07:39

रेड वाईन, डार्क चॉकलेट आणि बेरींमधील अँटिऑक्सिडंट हे हृदयविकार किंवा कर्करोगही रोखण्याइतके सक्षम असल्याचं म्हटलं जातं होतं....

बर्ड फ्लूचे लक्षण झटपट समजणार

Last Updated: Friday, May 9, 2014, 17:09

चीनच्या बिजिंगमधील शास्त्रन्यांनी बर्ड फ्लूचे लक्षण समजण्यावर उपाय शोधल्याचा दावा केला आहे. मानवाच्या रक्तात काही असे प्रोटीन्स असतात, जे बर्ड फ्लूच्या एच7एन9 या व्हायरसला मारण्याची क्षमता ठेवतात. या मानवी रक्तातील प्रोटीन्सचा शोध घेतल्याचा दावा चीनने केला आहे.

छोट्या पडद्यावरील `कुंभकर्ण` राकेश दीवानांचं निधन

Last Updated: Monday, April 28, 2014, 10:34

2008-09मध्ये टीव्हीवरील प्रसिद्ध मालिका `रामायण`मध्ये कुंभकर्णची भूमिका करणारे अभिनेते राकेश दीवाना यांचं दुर्दैवी निधन झालंय. दुर्दैवी यासाठी कारण त्यांच्या मृत्यूचं कारण म्हणजे त्यांची चरबी नाही तर त्यासाठी केलेलं ऑपरेशन ठरलं.

खरबूज खा, उन्हाळ्यात आजारांपासून दूर रहा!

Last Updated: Saturday, April 19, 2014, 08:00

उन्हाळ्याचं कामानिमित्त बाहेर पडायलाही जीवावर येतंय का?... आपल्या त्वचेची आणि आरोग्याची काळजी वाटते... तर तुम्हाला आम्ही सांगतोय यावर एक नैसर्गिक उपाय... तो म्हणजे खरबूज...

वॉट्स अॅपच्या व्यसनानं होऊ शकतो `वॉट्सअॅपिटिस`!

Last Updated: Wednesday, April 9, 2014, 17:50

सध्या वॉट्स अॅपचा जमाना आहे. मात्र तर वॉट्स अॅपवर खूप मॅसेजेस केल्यानंतर तुमचं मनगट दुखत असेल तर लक्षात घ्या तुम्हाला वॉट्सअॅपिटिस झालाय.

घड्याळाच्या काट्यांशी खेळ... जीवाला घोर

Last Updated: Tuesday, April 8, 2014, 10:55

घड्याळ्याच्या काट्यांशी खेळणं हे अगदी जीवावर बेतू शकतं, असा निष्कर्ष `युनिव्हर्सिटी ऑफ कोलोरेडो इन डेन`नं एका प्रयोगातून काढलाय. या प्रयोगाचं आणखी एक वैशिष्ट्यं म्हणजे एका मूळ भारतीय वैज्ञानिकाच्या अध्यक्षतेखाली हा प्रयोग पार पडलाय.

`सेल्फी` म्हणजे मेन्टल डिसऑर्डर...

Last Updated: Saturday, April 5, 2014, 20:11

`सेल्फी` हा प्रकार सोशल मीडियावर खूप गाजतोय. स्वत:च स्वत:चा फोटो काढून तो सोशल मीडियावर शेअर करणं हे जणू काही सध्याचं फॅड झालंय. पण, हा एक प्रकारचा मानसिक आजार असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

चिमुकल्यांमध्ये व्हिटॅमिन `ए`ची कमतरता हानिकारक

Last Updated: Tuesday, February 11, 2014, 17:42

`मिशिगन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ आणि मिशिगन यूनिव्हर्सिटी`च्या संशोधकांनी केलेल्या संशोधनात ही बाब स्पष्ट झाली. प्रयोगात केलेल्या निरिक्षणाद्वारे हे सिद्ध झालंय की, ज्या मुलांच्या आहारात व्हिटॅमिन `ए`चे प्रमाण कमी आहे, त्या मुलांना उलट्या, जुलाब, सर्दी आणि ताप यांसारख्या आजारांना सामोरं जावं लागतं.

थंडीचे दिवस सुरू झालेत... गूळ खा, स्वस्थ राहा!

Last Updated: Monday, December 16, 2013, 08:14

थंडीचे दिवस सुरू झालेत. आपली, आपल्या मुलांची, वृद्ध मातापित्यांच्या तब्येतीची काळजी तुम्हालाही सतावत असेलच ना! मग, त्यांची तब्येत जपण्यासाठी आपण अनेक प्रतिबंधात्मक उपाय करून त्यांची काळजी घेऊ शकतो. यामध्ये एक पदार्थ आपली सर्वात जास्त मदत करू शकतो... तो म्हणजे गूळ.

रोज व्यायाम करा आणि हाडांचे आजार टाळा

Last Updated: Friday, December 6, 2013, 18:56

ओस्टियोपोरोसिस (हाडांचा आजार) या समस्येमुळे हाडे कमकवत होतात आणि त्यांच्या घनतेत घट होत जाते. त्यामुळे शरीराचा हाडांचा सापळा हा कमजोर होतो.

मुंबईमध्ये ७० टक्के मधुमेहींचा आजार असाध्य अवस्थेत!

Last Updated: Wednesday, November 13, 2013, 17:18

असं मानलं जातं की मधुमेह हा आजार एकदा झाला की तो आयुष्यभर रुग्णाची सोबत करतो आणि त्यामध्ये उतार पडण्याची किंवा हा आजार पूर्णपणे बरा होण्याची काहीच शक्यता नसते. ‘डायबिटीस मेलिटस’ हा एक दीर्घकाळ शरीरात वास्तव्य करणारा आजार आहे.

वाढते वजन देते आजाराला निमंत्रण

Last Updated: Monday, October 28, 2013, 18:18

हल्लीच्या धावपळीच्या जीवनात स्वत:ची काळजी घ्यायलाही आपल्याकडे पुरेपुर वेळ नसतो. तासन् तास एकाचं जागेवर बसून काम करणे, अनियमित जेवणाच्या वेळा, झोपेचा अभाव, पिझ्झा, बर्गर, यांसारख्या फास्ट फूडच्या सवयीमुळे वजन वाढण्याच्या समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत.

चिमुरड्यांना गरज आहे उपचारासाठी तुमच्या मदतीची!

Last Updated: Friday, October 25, 2013, 11:35

खेळण्याबागडण्याच्या वयात काहीच दोष नसताना थायलेसिमिया मेजर हा गंभीर आजार त्यांना जडला आणि त्यांच्या जगण्याचा हक्क हिरावला गेला. मोलमजुरी करणारे वडील कसेबसे कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. अशात या चिमुरड्यांना गरज आहे उपचारासाठी तुमच्या मदतीची.

ऑक्टोबर हीट... मुंबईकर ठेवा स्वत:ला फीट!

Last Updated: Sunday, October 20, 2013, 23:13

महिनाभर जास्त काळ थांबलेल्या पावसाने निरोप घेताच घामाच्या धारांनी मुंबईकरांना बेजार केलंय.

मुंबईत आजारांनी डोक काढलं वर

Last Updated: Tuesday, October 15, 2013, 13:16

सध्या हवामानातील बदलाचा मुंबईकरांना चांगलाच फटका बसलाय. मुंबईत व्हायरल फिव्हर, मलेरीया आणि डेंग्यू सारखे साथीचे आजार बळावू लागलेत. याचबरोबर सर्दी-खोकला आणि गॅस्ट्रोसदृश्य आजारांनीही डोकं वर काढलं आहे.

हृदय जपा, मृत्यू टाळा!

Last Updated: Sunday, September 29, 2013, 15:04

आज जागतिक हृदयरोग दिवस. भारतात सुमारे सव्वाकोटी लोकांना हृदयाशी संबंधित आजार आहेत. तसंच यासंदर्भातील सर्वाधिक मृत्यूही भारतात होतायत. त्यामुळं हृदय जपा, मृत्यू टाळा असं म्हणण्याची वेळ आलीय.

संजूबाबाचा पॅरोल रजेच्या अर्जावर निर्णय तूर्तास लांबला!

Last Updated: Wednesday, September 18, 2013, 12:19

आपली पत्नी मान्यता हिच्या आजारपणाचं कारण पुढे करून संजय दत्तनं पॅरोलसाठी अर्ज दाखल केलाय. परंतु या अर्जावर देण्यात येणारा निर्णय आता पुढे ढकलण्यात आलाय.

वर्धा जिल्ह्यात डेंग्यूची साथ,५२ जणांना लागण!

Last Updated: Wednesday, September 11, 2013, 13:07

ऐन सणात वर्ध्यात डेंग्यूच्या साथीनं डोकं वर काढलंय. जिल्ह्यात तापानं दोन मुलांचा बळी घेतला तर आतापर्यंत २६१ जणांच्या केलेल्या रक्त तपासणीत ५४ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचं उघड झालंय. यातील सात रुग्ण जे जिल्ह्याबाहेरील असल्याची महिती आहे.

टाळी वाजवा, रोगांना पळवा!

Last Updated: Thursday, September 5, 2013, 10:48

अॅक्युप्रेशरच्या सिद्धांतानुसार मनुष्याच्या तळव्यावर त्याच्या संपूर्ण शरीराच्या अवयवांचे दबाव बिंदू असतात. जे दाबल्यानं संबंधीत अवयवांपर्यंत रक्त आणि ऑक्सीजनचा पुरवठा योग्य होतो आणि आजार बरे होण्यासही त्यामुळं मदत मिळते. या बिंदूंवर प्रेशर आणण्याचा सर्वात सोपी उपाय म्हणजे टाळी वाजवणं.

तरूणांमध्ये का वाढतोय आर्थराइटिस आजार

Last Updated: Saturday, August 31, 2013, 14:44

आधुनिक जीवन शैलीमुळे अनेक वेळा आपल्या त्रास होतो, थकवा येतो. पण धावपळीच्या जीवनात या गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाते. पण होणाऱ्या त्रासाला थकवा म्हणून दुर्लक्षित करणे हे चुकीचे आहे. कदाचित हे संधिवाताचे (आर्थराइटिस) लक्षण असू शकते. आजची स्थिती पाहता हा आजार तरूणांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतो.

बिहारमध्ये रिअल ‘पा’!

Last Updated: Tuesday, August 27, 2013, 14:10

काल्पनिक घटनेवर आधारीत ‘पा’ हा एक असा सिनेमा होता की, ज्यामध्ये अभिनेता अमिताभ बच्चन यांनी एका अशा मुलाची भूमिका केली की जो ‘प्रोजेरीया’ नावाच्या असाध्य आजारानं ग्रासलेला होता. पण बिहारमधील १४ वर्षीय अली हुसेन खान याच आजारानं ग्रस्त आहे.

`हरियाली`तले रहिवासी डासांमुळं हैराण!

Last Updated: Thursday, August 22, 2013, 12:30

विक्रोळीमधल्या हरियाली भागातले रहिवासी तापाच्या साथीनं आणि डासांच्या त्रासानं हैराण झालेत. महानगरपालिकेकडे विनंती करुनही धूर फवारणी आणि औषध फवारणी केली जात नसल्याची इथल्या नागरीकांची तक्रार आहे.

जास्त अभ्यास... वाढवे मानसिक ताण!

Last Updated: Tuesday, August 13, 2013, 18:07

कमी शिक्षणामुळं जीविकेवर होणारा परिणाम यामुळं आपल्या मानसिक स्थितीवर जास्त परिणाम होतो, असं आतापर्यंत मानलं जात होतं. मात्र वैज्ञानिकांच्या एका नव्या शोधानंतर हे लक्षात आलंय की, खूप जास्त शिक्षणानंसुद्धा मानसिक आजार होण्याची भीती बळावलीय.

मुंबईकरांनो डोळ्यांची काळजी घ्या!

Last Updated: Friday, August 2, 2013, 14:38

पावसाळा त्यात साथीच्या रोगांची लागण, हे समीकरण काही नवं नाही. पण मुंबईकरांनो सध्या सावध राहा आणि आपल्या डोळ्यांची काळजी घ्या. कारण मुंबईत डोळ्यांची साथ सुरू आहे.

घ्या पावसाचा मनसोक्त आनंद...

Last Updated: Sunday, July 21, 2013, 07:55

पाऊस जोरात पडतोय. बाहेर जाऊन पावसात मनसोक्त भिजण्याची इच्छा आहे पण भीती वाटतेय, ‘आजारी पडलो तर..., वस्तू खराब झाल्या तर...’

साथीच्या रोगांनी मुंबईकर बेजार!

Last Updated: Monday, July 1, 2013, 09:00

मुंबईत नेहमीप्रमाणं यंदाही पावसाळ्यात साथीचे रोग पसरण्यास सुरुवात झाली असून अनेक मुंबईकर यामुळं आजारी पडले आहेत. मुंबई महापालिकेच्या आणि खाजगी रुग्णालयांमध्ये सध्या साथीच्या रोगामुळं आजारी पडलेल्या रुग्णांची गर्दी दिसून येतंय.

ज्येष्ठ गायक मन्ना डे रूग्णालयात

Last Updated: Sunday, June 9, 2013, 13:47

ज्येष्ठ गायक मन्ना डे यांना बंगळूरमध्ये एका रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या छातीत दुखू लागल्याने तात्काळ रूग्णालयात दाखल केले.

`भुल्लरला फाशी देऊन काय मिळणार?`

Last Updated: Tuesday, April 16, 2013, 12:05

१९९३ मधल्या दिल्ली स्फोटातला दोषी देविंदर पाल सिंगची फाशी माफ करण्यासाठी पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांनी पंतप्रधानांची भेट घेतलीय.

रंगाचा बेरंग !

Last Updated: Tuesday, March 26, 2013, 23:48

काही लोक पैशांसाठी घातक रसायनयुक्त रंगाची विक्री करतात

नखाच्या रंगांवरून लागते आजारांची चाहूल...

Last Updated: Sunday, March 3, 2013, 19:43

वेगवेगळ्या आजारांमध्येही आपल्या नखाचे रंग बदलत जातात, असं नुकत्याच झालेल्या एका संशोधनामुळे समोर आलंय.

सेनेचे ज्येष्ठ नेते दत्ताजी नलावडे यांचं निधन

Last Updated: Friday, February 15, 2013, 07:46

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दत्ताजी नलावडे यांना आज पहाटे निधन झालंय. वयाच्या ७७ व्या वर्षी फुस्फुसाच्या प्रदीर्घ आजारानं त्यांचं निधन झालंय. त्यांच्यावर मुंबईतील जसलोक रुग्णालयात उपचार सुरू होते.

मॉरिशसला निघालेला `गजनी` कुठे झालाय गायब?

Last Updated: Tuesday, January 29, 2013, 10:40

गजनी मधल्या आमिर खाननं केलेल्या संजय सिंघानियाच्या भूमिकेशी मिळती जुळती ही गोष्ट... मॉरीशसहून मुंबईत आलेल्या डॉक्टर विवेकानंद कुंजा यांची...

फेसबुक प्रोफाईलवरून कळू शकणार मानसिक आजार

Last Updated: Sunday, January 27, 2013, 15:47

आता फेसबुक प्रोफाईलवर तुमच्या मानसिक आजाराचा पर्दाफाशदेखील होऊ शकतो. तुम्हांला काय मानसिक आजार आहे यासाठी आता तुम्हांला एखाद्या मानोसोपचार तज्ज्ञाकडे जावचं लागेल असं अजिबात नाही..

भूक लागल्यावर किती खायचे?

Last Updated: Tuesday, December 11, 2012, 20:11

आपण कोणता आहार घायचा. किती खायचे. प्रत्येक ऋतुत काय खायचे. आजारी असल्यावर काय आहार असला पाहिजे, असे एक ना अनेक प्रश्न प्रत्येकाला पडत असतात. मात्र, यावर एक सोपा उपाय आहे, तो म्हणजे तुमच्या पोटाला विचारा! जेवढे खावेसे वाटते तेवढेच खा.

यश चोप्रा लीलावती रूग्णालयात

Last Updated: Sunday, October 14, 2012, 18:07

८० वर्षीय प्रसिध्द चित्रपट निर्माता यश चोप्रा यांच्या तब्येतीत बिघाड झाल्याने त्यांना बांद्रा येथील लीलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वातावरणात झालाय बदल... जरा जपून!

Last Updated: Friday, October 12, 2012, 08:42

‘ऑक्टोबर हिट’चे चटके जाणावला सुरूवात झालीय. मुंबईत दिवसा कडक ऊन आणि रात्री पाऊस असं वातावरण पहायला मिळतंय. वातावरणात झालेल्या या बदलामुळे अनेक आजारदेखील बळावलेत.

`बिग बी` आजारी... सर्दी-खोकल्यानं हैराण

Last Updated: Monday, October 1, 2012, 15:15

बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन आजारी पडलेत. त्यांना सर्दी-खोकल्यानं हैराण करून सोडलंय. ही माहिती दुसरं तिसरं कुणी दिली नसून स्वत: ‘बिग बी’नंच दिलीय. तेही सोशल वेबसाईट ट्विटरवरून...

टीम इंडियांच खरं नाही, युवराज-रैना पडले आजारी

Last Updated: Saturday, September 22, 2012, 11:26

टी-२० वर्ल्डकप श्रीलंकेत सुरू आहे. मात्र भारतीय टीमचं काहीही खरं नाही. कारण टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी चांगलाच चिंतेत पडला आहे.

अमरावतीत विषाणुजन्य आजाराचा कहर

Last Updated: Monday, September 10, 2012, 19:51

अमरावती जिल्ह्यातल्या वरुड तालुक्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही विषाणुजन्य आजारानं कहर केलाय. वेगवेगळ्या आजारानं मागील अडीच महिन्यात सतरा जणांचा मृत्यू झालाय. तर अद्याप शेकडो नागरिक खासगी आणि सरकारी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

मुंबई आजारांच्या गराड्यात!

Last Updated: Wednesday, July 25, 2012, 09:56

मुंबई डेंग्यू आणि मलेरियाच्या विळख्यात सापडलीय. याशिवाय कॉलरा आणि डायरियानंही आजारी असलेल्या मुंबईतील रुग्णांच्या संख्येत वाढ झालीय. मुंबई महापालिकेनं जारी केलेल्या गेल्या तीन वर्षातील आकडेवारीतून हे समोर आलंय.

पावसाळा : आजारांवर कशी कराल मात?

Last Updated: Thursday, July 19, 2012, 10:43

आरोग्याची सर्वाधिक काळजी घेण्याचा ऋतूही पावसाळाच असतो. या ऋतूत पाण्यापासून होणा-या आजारांपासून बचावाची जशी आवश्यकता असते तशीच आवश्यकता असते, ती डासांपासून बचावाची. पिण्याचे पाणी दूषित असल्यास डायरिया, टायफॉईड, कावीळ, मलेरिया, डेंग्यू तसेच ऍलर्जी यासारख्या आजारांची लागण होऊ शकते. तर सर्दी, खोकला व तापाची लागण होण्याचीही दाट शक्यता असते.

अभिनेते दारासिंग यांची प्रकृती खालावली

Last Updated: Monday, July 9, 2012, 23:49

ज्येष्ठ अभिनेते दारासिंग यांची प्रकृती नाजूक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. त्यांच्या रक्तात ऑक्सिजनची पातळी खालावली आहे. गेल्या ३६ तासांपासून त्यांची प्रकृती खालावली असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय.

दारा सिंग यांची प्रकृती गंभीर

Last Updated: Sunday, July 8, 2012, 13:27

ज्येष्ठ अभिनेते दारासिंग यांची प्रकृती गंभीर असून त्यांना अंधेरीच्या कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. शनिवारी संध्याकाळीच प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

कॅम्बोडियात अज्ञात आजारानं घेतले 61 बळी

Last Updated: Thursday, July 5, 2012, 15:28

इंडो-चायनाच्या पश्चिम भागातील कॅम्बोडिया या देशात एका अज्ञात आजारानं एकच खळबळ उडालीय. या अज्ञात आजारामुळे आत्तापर्यंत 61 मुलांना आपला जीव गमवावा लागलाय, अशी माहिती जागतिक आरोग्य विभागानं (WHO) नं दिलीय.

रंग खेळताना घ्या त्वचेची काळजी

Last Updated: Thursday, March 8, 2012, 11:24

रंगपंचमीचा सण म्हणजे धुळवड होणारच. मात्र रंगांची उधळण होताना या रंगांपासून आपल्या त्वचेची काळजी घेणंही महत्त्वाचं आहे. कारण, रासायनिक रंग त्वचेला तसंच डोळ्यांनाही हानी पोहोचवू शकतात.

काला आजारवर अखेर लस विकसीत

Last Updated: Thursday, February 23, 2012, 18:23

उत्तर भारतात काला आजाराच्या थैमानात दरवर्षी शेकडो लोकांना आपले प्राम गमवावे लागतात. जगात मलेरियाच्या पाठोपाठ सर्वाधिक मृत्यू काला आजारामुळे होतात. आता पहिल्यांदाच काला आजारवर लस तयार करण्यात यश आलं असून लवकरच वैद्यकीय चाचणीच्या टप्प्याला सुरुवात होईल.

शंखनाद करा, आजार दूर पळवा

Last Updated: Wednesday, February 1, 2012, 16:30

तुम्हाला जर खोकला, दमा, बल्ड प्रेशर किंवा हृदयाशी संबंधित साधारण पण तरीही गंभीर आजार असतील, तर ते पळवण्यासाठी एक अत्यंत साधा सोपा घरगुती इलाज आहे. दररोज शंख वाजवा.

तुळस आजारांवरही रामबाण

Last Updated: Tuesday, January 10, 2012, 15:40

भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने ( डीआरडीओ) तुळशीपासून बनविल्या औषधाची पहिली चाचणी यशस्वी घेतली. तुळशीतील ऑक्सिडीकरण रोधक (अँटी ऑक्सिडंट) गुणधर्माचा किरणोत्साराने बाधित झालेल्यांच्या खराब पेशी व्यवस्थित करण्यास उपयोग होऊ शकतो, असे आढळल्यानंतर 'डीआरडीओ'च्या संशोधकांनी हे औषध बनवण्यास सुरुवात केली.

अण्णा आजारीच..

Last Updated: Sunday, January 1, 2012, 14:31

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर पुण्यातल्या संचेती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू करण्यात आलेत. अण्णांच्या छातीमध्ये इन्फेक्शन झालं असून तापही असल्यानं त्यांची प्रकृती खालावली आहे.