भात, शेंगदाण्याने खाण्याने काय होते?, Rice and ground nut is unfit?

भात, शेंगदाण्याने खाण्याने काय होते?

भात, शेंगदाण्याने खाण्याने काय होते?
www.24taas.com,मुंबई

भात (राईस) आणि शेंगदाणे खाण्याने तुमचा कोलेस्ट्रेरॉल वाढतो, असा समज आहे. मात्र, यातील महत्वाची बाब कोणी लक्षात घेत नाही. त्यामुळे गैरसमज होतात. शेंगदाणे आणि भात खाण्याने तुम्हाला चांगली एनर्जी मिळते, हे मात्र नक्की. तुमच्या उत्साह वाढीस लागतो.

शेंगदाण्याने कोलेस्ट्रेरॉल वाढत नाही, कारण शेंगदाणे किंवा भात आपण नुसता खात नाही. भातावर वरण, आमटी किंवा दही, दूध, ताक असे पदार्थ घेत असतो. तसेच शेंगदाणे नुसते न खाता त्याचं कूट कोशिंबीर किंवा भाजीत घालून खावे. त्याने काय होते की, आपल्याला कोणताही अपाय होत नाही.

कोकणात प्रमुख अन्न भात आणि मासे आहे. कोकणी माणूस आपल्याला नेहमीच उत्साहात दिसतो, त्याचं कारणही तसंच आहे. कारण तो नियमित भात खात असतो. जेवण पोटभर आणि समाधानकारक झाले, तर त्याचे मन प्रसन्न राहते. भात किंवा इतर पदार्थ शिजविण्याची आपली महाराष्ट्रीय पद्धत चांगली असून आपण ती कायम ठेवली पाहिजे. त्यामुळे तुम्हाला अधिक आनंद मिळतो.

शेंगदाणे असेच खावू नये, हे पथ्य प्रत्येकाने पाळले तर कशाचाही धोका राहत नाही. त्यामुळे तुमच्या मनात जी शंका आहे, ती दूर होण्यास मदत होईल. तर काहींना भात खाल्ला तर आपण जाडे होऊ असे वाटते. मात्र, यात काही तथ्य नाही. त्यामुळे भात, शेंगदाणे बिनधास्त खा आणि निर्धास्त व्हा.

First Published: Thursday, December 6, 2012, 13:54


comments powered by Disqus