‘ओएसए’वर यशस्वी रोबोटिक सर्जरी!, robotic surgery on obstructive sleep apnea (OSA)

‘ओएसए’वर यशस्वी रोबोटिक सर्जरी!

‘ओएसए’वर यशस्वी रोबोटिक सर्जरी!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

‘ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ऐप्निया’ किंवा ‘ओएसए’ या आजाराबद्दल लोकांमध्ये फारशी जागृगता नसली तरी हा आजार भारतीयांना मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. याच आजाराशी संबंधित प्रत्यक्ष रोबोटिक सर्जरी कोर्सचे एशियन हार्ट इन्स्टिट्युटमध्ये नुकतेच आयोजन करण्यात आले होते. ही शस्त्रक्रिया वेबकास्टच्या माध्यमातून पाहण्याची संधी जगभरातील २००० पेक्षा अधिक डॉक्टर्सना मिळाली.

ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ऐप्निया (ओएसए) ही झोपेत उद्भवणारी समस्या असून यामुळे निद्रितावस्थेत असलेली व्यक्ती शेकडोवेळा श्वासोच्छ्वास बंद करते. श्वसनप्रक्रियेत जे हे अंतर येते, त्यालाच ऐप्निया असे म्हंटले जाते. झोपेत असताना वेगवेगळ्या वेळेस उर्ध्व श्वसनमार्गातील पेशींचे कार्य बंद पडून श्वसनमार्ग बंद होतो, त्यामुळे ही समस्या उद्भवते.

रोबोटिक सर्जरी कोर्समध्ये या आजाराशी संबंधित जीभेच्या खालील बाजूस केल्या जाणाऱ्या ट्रान्सोरल रोबोटिक सर्जरीच्या (टीओआरएस) या नवीन तंत्राविषयी माहिती देण्यात आली. भारतीयांना ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ऐप्नियाचा धोका अधिक का आहे, याविषयी सांगताना डॉ.अगरवाल यांनी सांगितले, आपले चेहेरे हे अधिक सपाट प्रकारचे असतात आणि आपली हनुवटीही-पाश्चात्यांप्रमाणे बाहेर आलेली नसते. याचा परिणाम म्हणून आपली जीभ ही अनेकदा घशाच्या मागील बाजूस अधिक दाबली जाते. कन्टिन्युअस पॉझिटीव्ह एअरवे प्रेशर (सीपीएपी) मास्क ही उपचार पद्धती पाश्चिमात्यांच्या तुलनेत आपल्याकडे फारशी परिणामकारक न ठरण्याचे हेही एक कारण आहे.

‘ओएसए’वर यशस्वी रोबोटिक सर्जरी!

जागतिक ख्याती असलेले प्राध्यापक डॉ. विसिनी यांनी हे या सर्जरीविषयी अधिक माहिती देताना सांगतात, जीभेच्या खालील बाजूस टीओआरएस ही शस्त्रक्रिया करतानाने आतापर्यंत पारंपारिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या सीपीएपी उपचारांच्या तुलनेत अधिक प्रमाणात लाभ प्राप्त होतात. सीपीएपी पद्धतीमध्ये रूग्ण निद्रितावस्थेत असताना मास्कच्या मदतीने हवा पुरविली जाते आणि यासाठी एअरवे खुला ठेवण्यात येतो. टीओआरएस ही ओएसएकरिता अत्यंत परिणामकारक शस्त्रक्रिया आहे, कारण यामध्ये अत्यंत अचूक असे रोबोटिक सहाय्य उपलब्ध होते. एरवी जीभेच्या जड आकारमानामुळे याजागी शस्त्रक्रिया करणे किंवा तिथेपर्यंत पोहोचणेही कठीण होऊ शकते. मात्र रोबोटिक तंत्राच्या मदतीने जीभेच्या खालील बाजूची ही शस्त्रक्रिया सुलभपणे पार पडते.

‘ओएसए’वर यशस्वी रोबोटिक सर्जरी!

स्थूल असलेल्या व्यक्तींमध्ये ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ऐप्नियाची लक्षणे आढळण्याचे प्रमाण चार पटीने अधिक असते. पण आता स्थूलता नसलेल्या व्यक्तींमध्येही ओएसएची लक्षणे अधिक प्रमाणात दिसून येत आहेत. एका अहवालानुसार भारतीयांमध्ये ओएसए या आजाराचे प्रमाण १३ टक्के इतके आहे आणि त्यापैकी केवळ ४ टक्के रूग्णच डॉक्टरांकडे जातात. तसेच स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांमध्ये या आजाराचे प्रमाण तीनपट आहे.

डॉ.विकास अगरवाल यांना ही किचकट आणि आव्हानात्मक शस्त्रक्रिया रोबोटिक तंत्र आणि एन्डोस्कोपिच्या सहाय्याने करणारे भारतातील पहिले शल्यविशारद असल्याचे श्रेय प्राप्त झाले आहे.

First Published: Thursday, August 1, 2013, 16:51


comments powered by Disqus