Last Updated: Thursday, December 19, 2013, 18:56
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई हिवाळ्यातल्या कडाक्याच्या थंडीत व्यायाम कसा करावा आणि कशाप्रकारे आहार घ्यावा हे जाणून घ्या स्वत: सुहास खामकरच्या फिटनेस टिप्समधून...
• हिवाळा हा व्यायाम सुरू करण्यासाठी चांगला ऋतू आहे का? यात किती तथ्य आहे?
असं काही नसतं जेवण खाणं, आंघोळ या गोष्टींना जसं महत्त्व देतो. तसंच व्यायामाला देखील वर्षभरात तेवढंच महत्त्व दिलं पाहिजे. हिवाळ्यात व्यायाम करताना घामाचं प्रमाण कमी असतं त्यामुळं जास्त प्रमाणात भूक लागते. या सर्व गोष्टींमुळं व्यायाम सोपा आणि सुसह्य होतो, हे नक्की...
• थंडीत आहार कसा असावा?
आरोग्याला हानिकारक गोष्टी वर्षभर टाळाव्यात. तसंच कार्ब्स आणि प्रोटिन्सयुक्त आहार असावा. यात अंडी, चिकण, दूध याचं प्रमाण चांगल्याप्रकारं असणं गरजेचं आहे. या ऋतूत थोडा जास्त व्यायाम केल्यास हरकत नाही. पण त्यासाठी पुरेपूर आहार नक्की करावा.
• थंडीत कुठली स्पेशल काळजी करावी?
मुंबईत तापमानात जास्त फरक पडत नाही. तरीही जास्त थंडी असेल तेव्हा वॉर्मअप जास्त करावा. नाही तर इंज्युरी होण्याची शक्यता असते.
• ऋतुनूसार व्यायाम प्रकार बदलावे का?
ही गोष्ट खरी आहे मात्र व्यक्तीनुसार गरज असल्यास नक्की बदल करावा. गर्मीमध्ये शरीरातील पाणी कमी हाऊ शकते. त्यामुळं जास्त पाणी पिण्याची गरमीत सवय असावी, नाही तर व्यायाम करताना चक्कर येणं वैगरे प्रकार घडू शकतात. अशावेळी जास्त फळं खाऊन पाण्याची कमतरता मिटवावी.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, December 19, 2013, 13:30