टीम इंडियापुढे २५८ रन्सचे आव्हान, india vs england in mohali

टीम इंडियापुढे २५८ रन्सचे आव्हान

टीम इंडियापुढे २५८ रन्सचे आव्हान
www.24taas.com,मोहाली

इंग्लडने टीम इंडियापुढे विजयासाठी २५८ रन्सचे आव्हान ठेवले आहे. इंग्लंडकडून ऍलिस्टर कूक, केवीन पीटरसन आणि ज्यो रूट यांनी अर्धशतके झळकावलीत.

टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

जो रुटची आक्रमक फलंदाजी, केविन पीटरसन आणि ऍलिस्टनर कुक यांच्या दमदार अर्धशतकांच्या जोरावर इंग्लंडने ७ बाद २५७ रन्सपर्यंत मजली मारली. संथ सुरुवात केल्यापनंतर कुक आणि पीटरसन यांनी सावध फलंदाजी करीत अर्धशतकी भागीदारी केली.

ही जोडी फुटल्यांनंतर टीम इंडियाने २ झटपट विकेट घेतल्या. परंतु, पीटरसन आणि रुट यांनी आक्रमक फलंदाजी करीत रन्स वाढविल्यात. जो रुटने अखेरच्याआ षटकांमध्ये फटकेबाजी केली. त्याने केवळ ४५ चेंडूमध्ये ४ चौकार आणि १ षटकार ठोकून ५७ रन्स काढल्या.

विराट कोहलीने जो रुटचा शून्यारवर झेल सोडला. त्या्नंतर त्याने पीटरसनसोबत चांगली भागीदारी केली. तर अखेरच्या ५ षटकांमध्येश बटलर आणि ट्रेडवेलच्या साथीने संघाला २५७ रन्सपर्यंत मजल गाठून दिली. अखेरच्या‍ १० षटकांमध्ये इंग्लंलडने १०० रन्स काढल्या‍.

रवींद्र जडेजाने ३, आर. अश्विन आणि इशांत शर्माने प्रत्येलकी २ विकेट घेतल्या. भुवनेश्व र कुमार आणि शमी अहमद हे फारसा प्रभाव पाडू शकले नाही.

First Published: Wednesday, January 23, 2013, 17:19


comments powered by Disqus