Last Updated: Monday, June 16, 2014, 20:45
www.24taas.com, झी मीडिया, इंदौर इंदौरच्या खासगी महाविद्यालयानं उलटं जालत जाण्याचा अनोखा विक्रम करत `गिनीझ बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड`मध्ये आपलं नाव नोंदवलंय.
2 मार्च रोजी `प्रेस्टीज इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट आणि रिसर्च (पीआयएमआर) महाविद्यालयातील 1107 लोक सहभागी होऊन पायाने उलट चालत गेले. हाच प्रयोग `गिनीझ वर्ल्ड रेकॉर्ड`मध्ये नोंदविला गेला असल्याचं, इन्स्टिटयुटचे मीडिया प्रतिनिधी राजू जॉन यांनी रविवारी सांगितलं.
मागे वळूनही न पाहता सहभागी झालेल्या सभासदांनी काही किलोमीटरवर असलेल्या विजय नगर गाठलं. त्यामुळे याअगोदर चीनच्या एका कंपनीनं या कॅटेगिरीमध्ये केलेला रेकॉर्ड मोडला गेलाय, असंही राजू यांनी स्पष्ट केलंय. उलट चालत जाण्याचा असाच एक प्रयोग सर्वप्रथम 10 जून 2012 रोजी चीनमधली शांघाई शहरातल्या एका कंपनीशी संबंधित अशा 1,039 लोकांनी `गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड`मध्ये नोंदवला होता.
`गिनीझ वर्ल्ड रेकॉर्ड`चं सर्टिफिकेट मिळाल्यानं महाविद्यालयाच्या सर्वच सभासदांनी आनंद व्यक्त केलाय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, June 16, 2014, 20:45