घरातून पळाली पण सामूहिक बलात्काराच्या चक्रात अडकली, 3 time gang rape on minor girl after she left ho

घरातून पळाली पण सामूहिक बलात्काराच्या चक्रात अडकली

घरातून पळाली पण सामूहिक बलात्काराच्या चक्रात अडकली

www.24taas.com, झी मीडिया, जयपूर

छोट्या गोष्टीवरून घरात झालेल्या भांडणाला कंटाळून एका अल्पवयीन मुलीनं आपलं घर सोडलं... पण, पुढे तिच्यावर जो प्रसंग ओढावला त्यानं ही मुलगी पुरती हादरून गेलीय. पोलिसांच्या हाती सापडेपर्यंत या मुलीवर तब्बल तीन वेळा वेगवेगळ्या लोकांनी सामूहिक बलात्कार केला. धक्कादायक म्हणजे, तिच्यावर सामूहिक बलात्कार करणाऱ्या आरोपींमध्ये दोन रेल्वे पोलिसांचाही समावेश आहे. या मुलीनं या पोलिसांकडे मदतीची याचना केली होती.

एका मित्रानं गिफ्ट दिलेला मोबाईल फोन स्वीकारला म्हणून संबंधित 16 वर्षांच्या मुलीला तिच्या आईनं फैलावर घेतलं होतं. आई रागावल्याचा राग मनात धरून या मुलीनं घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला. यानंतर आईनं मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत नोंदवली होती.

घरातून पळाल्यानंतर या मुलीनं एका मुलाकडून मोटारसायकलची लिफ्ट घेतली होती. हा मुलगा व त्याच्या मित्राने तिच्यावर पिलवा येथे सामूहिक बलात्कार केला. या धक्क्यातून सावरण्याआधीच ही मुलगी अल्वरला येत असताना रेल्वेत भेटलेल्या दोन मुलांनी तिच्यावर अत्याचार केला. हा तिच्यासोबत झालेला दुसरा सामूहिक बलात्कार होता. घाबरलेली ही मुलगी अल्वर स्थानकात बसलेली असताना मदतीच्या बहाण्याने आलेल्या दोन रेल्वे पोलिसांनीही तिच्यावर तिसऱ्यांदा अत्याचार केला.

स्थानिक पोलिसांनी या मुलीची दौसा जिल्ह्यातील जटवाडा येथून सुटका केली, अशी माहिती दौसाचे पोलीस अधीक्षक अंशुमान भोमिया यांनी दिलीय. गुन्ह्यात सहभागी असलेल्या रेल्वे पोलिसांना अटक करण्यात आलीय.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, May 9, 2014, 15:24


comments powered by Disqus