गंगेमधून काढले ४८ मृतदेह बाहेर 48 corpses bring out from Ganges

गंगेमधून काढले ४८ मृतदेह बाहेर

गंगेमधून काढले ४८ मृतदेह बाहेर
www.24taas.com, झी मीडिया, हरिद्वार

उत्तरकाशीमध्ये आलेल्या प्रलयानंतर सध्या पाऊस थांबला आहे. गंगेच्या पाण्याची पातळी कमी आहे. त्यामुळे नदीत वाहून गेलेले मृतदेह आता सापडत आहेत. हरिद्वारमध्ये गंगेमध्ये वाहात असलेले ४८ मृतदेह पोलिसांनी काढले आहेत.

या मृतदेहांची ओळख पटणं कठीण झालं आहे. ओळख पटण्यासाठी मृतदेहांची डीएनए टेस्ट करावी लागणार आहे. प्रलयात चिखलमाती झाली त्यांची मोददाद करण्यापेक्षा जे जीवंत आहेत त्यांना वाचवण्याला यंत्रणेनं प्राधान्य दिलं जात आहे. प्रतिकुल परिस्थितीत एनडीआरएफ, आयटीबीपी आणि अन्य यंत्रणांचे जवान रात्रं दिवस प्रयत्नांची शर्थ करत आहेत.

हजारो लोकांची सुटका झाली असली तरी दुर्गम स्थळी अडकून पडलेल्या हजारो लोकांपर्यंत आणखी काही दिवस मदत पोहचणं निव्वळ अशक्य आहे. त्यात दोन दिवसांत उत्तरकाशी अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली गेल्यामुळे बचाव कार्यात अजून अडचण येणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Saturday, June 22, 2013, 09:30


comments powered by Disqus