Last Updated: Thursday, June 20, 2013, 19:41
www.24taas.com, झी मीडिया, पाटणाउत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक नागरिकांचा बळी गेला असून, अद्यापही बेपत्ता आहेत. दुर्घटनाग्रस्त नागरिकांसाठी ज्येष्ठ अभिनेते आणि राजकीय नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी ५० लाख रुपयांची मदत आज जाहीर केली आहे.
उत्तराखंडला पावसाचा मोठा फटका बसला असून, अनेकांना जीव गमवावा लागला आहे. विविध भागात अद्यापही अनेकजण अडकून पडले आहेत. दुर्घटनाग्रस्त नागरिकांना मदत म्हणून माझ्या फंडामधून ५० लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे, असे सिन्हा यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले.
पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी एक हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली असून चांगला निर्णय घेतला आहे. मात्र, उत्तराखंडला मदतीची गरज आहे. उत्तराखंडवर माझे प्रेम असून, तेथील भागाला अनेकवेळा मी भेट दिली आहे. माझी भूमिका असलेल्या अनेक चित्रपटांचे चित्रीकरण तेथे झाले आहे. उत्तराखंडला निसर्गाचा फटका बसल्यामुळे मदत करणे माझे कर्तव्य आहे, असेही सिन्हा म्हणाले.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, June 20, 2013, 19:39