Last Updated: Tuesday, November 13, 2012, 19:44
www.24taas.com, जबलपूर राम जेठमलानी यांनी प्रभू श्रीराम हे अत्यंत वाईट पती होते असे वक्तव्य केल्यानंतर अनेक ठिकाणी त्यांचा निषेध करण्यात आला. मात्र त्यामुळे राम जेठमलानींच्या तोंडावर थुंकणाऱ्या ५ लाखाचं बक्षीस देण्यात येणार असल्याचं एका धार्मिक गुरूंनी सांगितले आहे.
प्रभू श्रीरामाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राम जेठमलानी यांच्याविरोधात हिंदू संतांमध्ये प्रचंड रोष व्यक्त करण्यात येत आहे. जेठमलानी यांची जीभ कापण्यासाठी एका गटाने ११ लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केल्यानंतर आता त्यांच्या चेह-यावर जो थुंकेल, त्याला पाच लाख रुपयांचे बक्षिस दिले जाईल, अशी घोषणा जबलपूर येथील एका धार्मिक गुरूंनी केली आहे.
जबलपूर येथील गीताधाम आश्रमाचे धार्मिक गुरु महामंडलेश्वर स्वामी श्यामदास महाराज यांनी ही घोषणा केली. श्यामदास महाराजांची ही ऑफर खासकरून युवकांसाठी आहे. या घोषणेनंतर त्यांच्या भक्तांनी जेठमलानी यांच्या चेह-यावर थुंकण्यासाठी तयारीही सुरु केली आहे.
First Published: Tuesday, November 13, 2012, 16:33