रमेश अग्रवालांचा ग्रीन नोबल पुरस्कार देऊन गौरव

Last Updated: Thursday, May 1, 2014, 08:56

कोळसा माफियांविरोधात चळवळ उभी करणाऱ्या रमेश अग्रवाल यांना प्रतिष्ठेचा ग्रीन नोबल पुरस्कार देऊन गौरवण्यात आलंय.

इंटरनेटला 'हायस्पीड': भारतीयाला `टेक्नॉलॉजी नोबेल`

Last Updated: Monday, January 27, 2014, 14:54

भारतीय प्राध्यापक आणि शास्त्रज्ञ आरोग्यास्वामी यांनी 4 जी आणि `वाय-फाय`सेवेचं आरोग्य सुधारलंय, तसेच प्राध्यापक आरोग्यास्वामी जोसेफ पॉलराज यांना २०१४ चा मारकोनी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

कमी वयाची महिला ठरली बुकर पुरस्काराची विजेती

Last Updated: Wednesday, October 16, 2013, 12:05

यंदाच्या मॅन बुकर पुरस्काराची विजेती सर्वात कमी वयाची महिला ठरली आहे. अवघ्या २८ व्या वर्षी हा पुरस्कार न्यूझीलंडच्या लेखिका एलिनॉर कॅटॉन यांना मिळाला आहे. दरम्यान, या पुरस्काराच्या अंतिम शर्यतीत भारतीय वंशाची अमेरिकन लेखिका झुंपा लाहिरी मागे पडल्यात. त्यांचे `द लोलॅड` हे पुस्तक होते.

‘ओपीसीडब्ल्यू’ला नोबल शांतता पुरस्कार घोषीत

Last Updated: Friday, October 11, 2013, 16:47

सर्वांना उत्सुकता लागलेलं यंदाचे शांततेचा नोबेल पुरस्कार ‘ओपीसीडब्ल्यू’ (Organisation for the Prohibition of Chemical Weapons) अर्थात ‘रासायनिक शस्त्रविरोधी संघटने’ला मिळालाय.

शरीरविज्ञानशास्त्र क्षेत्रातील नोबेल तिघांना विभागून

Last Updated: Monday, October 7, 2013, 19:18

यावर्षीचा शरीरविज्ञानशास्त्र क्षेत्रातील संशोधनासाठीचा नोबेल पुरस्कार विभागून जाहीर करण्यात आला आहे. दोन अमेरिकन आणि एक जर्मन असे तीन शास्त्रज्ञ या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. जेम्स ई रोथमन, रँडी डब्ल्यू शेकमन हे अमेरिकन तर थॉमस सी स्युडॉफ हे जर्मन शास्त्रज्ञ आहेत.

शांततेच्या नोबेलसाठी व्लादिमिर पुतिन यांचं नामांकन

Last Updated: Thursday, October 3, 2013, 08:10

सीरियावरील हल्ला ज्यांनी आपल्या मध्यस्थीनं रोखला, ते रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या नावाचं यंदाच्या शांततेसाठी देण्यात येणाऱ्या नोबेल पुरस्कारासाठी नामांकन केलंय.

तेरा महिन्यानंतर १ कोटीचे मिळाले बक्षिस

Last Updated: Tuesday, March 26, 2013, 17:35

भारताला मार्च २०१२मध्ये कबड्डीचा विश्वचषक मिळवून देणाऱ्या तिन मराठी कन्यांना तब्बल १३ वर्षांनंतर त्यांचे जाहीर झालेले १ कोटी रूपयांचे बक्षिस मिळाले आहे. यासाठी झी २४ तासने पाठपुरावा केला. तेव्हा कुठे त्यांची बक्षिसाचे रक्कम हातात पडली.

पाकच्या मलालाची नोबेलसाठी शिफारस

Last Updated: Saturday, February 2, 2013, 20:30

स्त्री शिक्षणाबरोबरच शांततेसाठी प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानच्या मलाला युसूफजाई हिच्यावर तालिबानींनी जीवघेणा हल्ला केला. यातून बचावलेल्या मलाला हिची यंदाच्या शांततेसाठीच्या नोबेल पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.

पाक सैनिकांचं मुंडकं छाटून आणणाऱ्याला १ करोड!

Last Updated: Tuesday, January 15, 2013, 14:03

पुँछ भागात पाकिस्तान सेनेकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करून दोन भारतीय जवानांची अत्यंत क्रूर पद्धतीनं हत्या करण्यात आल्यानंतर पंजाब शिवसेना उसळलीय. पाकिस्तानी सैनिकांचं मुंडकं छाटून आणणाऱ्या व्यक्तिला एक करोड रुपयांचं बक्षीसचं त्यांनी जाहीर केलंय.

‘मलालाला मिळावा नोबेल पुरस्कार’

Last Updated: Wednesday, November 14, 2012, 18:23

पाकिस्तानी मानवाधिकार कार्यकर्ती मलाला युसूफजई हिला नोबेल शांति पुरस्कारासाठी नामांकन मिळावं, यासाठी अमेरिकेत एक ऑनलाईन अभियान सुरू झालंय.

राम जेठमलानीवर थुंका आणि ५ लाख कमवा

Last Updated: Tuesday, November 13, 2012, 19:44

राम जेठमलानी यांनी प्रभू श्रीराम हे अत्यंत वाईट पती होते असे वक्तव्य केल्यानंतर अनेक ठिकाणी त्यांचा निषेध करण्यात आला.

युरोपीय संघाला शांततेचा नोबेल पुरस्कार

Last Updated: Saturday, October 13, 2012, 18:34

शांततेचा नोबेल पुरस्कार युरोपीय संघाला जाहीर झाला आहे. हा पुरस्कार २०१२ साठी आहे. १.२ मिलीयन अमेरिकन डॉलर्स एवढी पुरस्कार रक्कम असलेला हा पुरस्कार ऑस्लोमध्ये १० डिसेंबरला प्रदान करण्यात येईल.

साहित्यातील नोबेल चीनच्या मो यान यांना

Last Updated: Thursday, October 11, 2012, 21:43

जागतिक क्षेत्रात मानाचा समजला जाणारा साहित्यातील २०१२ या वर्षाचा नोबेल पुरस्कार चीनचे लेखक मो यान यांना जाहीर झाला आहे. स्वीडीश अकादमीने आज स्टॉकहोम येथे या पुरस्काराची घोषणा केली. विज्ञान, साहित्य आणि शांततेसाठी नोबेल पुरस्कार देण्यात येतो.

नोबेल विजेते हरगोबिंद खोराना यांचे निधन

Last Updated: Saturday, November 12, 2011, 13:49

नोबेल पुरस्काराने सन्मानित हरगोबिंद खोराना यांचे अमेरिकेतील कॉनकर्ड मॅसाच्युसेटस इथे निधन झालं. ते ८९ वर्षांचे होते. हरगोबिंद खोराना यांना मार्शल निरेनबर्ग आणि रॉबर्ट हॉले यांच्या समवेत १९६८ साली वैद्यकीयशास्त्र शाखेतील योगदानासाठी नोबेल सन्मानित करण्यात आलं होतं.