Last Updated: Saturday, October 27, 2012, 16:37
www.24taas.com, हैदराबाद हैदराबाद येथे मालिकेच्या शूटिंगदरम्यान अभिनेत्याचा कारवरील ताबा सुटल्याने एक सहा वर्षीय मुलाचा कारखाली चिरडून मृत्यू झाला आहे.
सात्त्विक रेड्डी असे या मुलाचे नाव असून तो आपल्या पालकांसोबत शूटिंग पाहायला आला होता. त्यामुळे त्याच्या पालकांवर तर आभाळच कोसळले आहे.
चंद्रनगर येथील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ‘एका मालिकेतील तेलुगू अभिनेत्याचा शूटिंगदरम्यान गाडीवरील ताबा सुटला व त्यात एका मुलाचा मृत्यू झाला व एक लहान मुलगी जखमी झाली आहे.’
First Published: Saturday, October 27, 2012, 16:15