आठ वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार; शेतात दिलं फेकून, 8 years old girl raped in UP

आठ वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार; शेतात दिलं फेकून

आठ वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार; शेतात दिलं फेकून
www.24taas.com, झी मीडिया, लखनऊ

एका आठ वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करून तिला शेतात फेकून दिल्याची धक्कादायक घटना उत्तरप्रदेशात उघडकीस आलीय. रात्रभर अंधारात निर्जन ठिकाणी ही चिमुरडी आक्रंदन करत पडली होती.

उत्तरप्रदेशातल्या भदोईमधल्या रायपूर इथली ही घटना... संबंधित मुलगी ही केवळ आठ वर्षांची चिमुरडी आहे. शेजारीच राहणाऱ्या एका तरुणानं हे घृणास्पद कृत्यं केलंय. मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शनिवारी रात्री मुलगी घराबाहेर झोपलेली असताना सोनू नावाचा युवक तिला निर्जन स्थळी उचलून घेऊन गेला आणि तिथे तिच्यावर बलात्कार केला. त्या नराधमाने बालिकेला तिथेच सोडून तो पळून गेला.

आई-वडीलांना आपली चिमुरडी जागेवर नसल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी तिचा शोध सुरू केला. रात्रीच्या अंधारात वेदनेनं विव्हळत पडलेली ही चिमुरडी त्यांना जवळच्याच एका शेतात सापडली.

पीडित मुलीच्या पालकांच्या तक्रारीवरून सोनू विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले असून त्याच्यावर एक डझनहून अधिक गुन्हे दाखल आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, September 3, 2013, 10:57


comments powered by Disqus