फेसबुकवरचं चॅटिंग पडलं महागात, विद्यार्थिनीवर बलात्कार

Last Updated: Wednesday, April 16, 2014, 11:06

एका शालेय विद्यार्थिनीची फेसबुकवर एका तरुणासोबत मैत्री झाली. आपल्या कुटुंबाला भेटवून देतो असं म्हणून तरुणानं मुलीला घरी बोलावलं आणि तिच्यावर अतिप्रसंग केला. ही घटना आहे उत्तरप्रदेशच्या रुद्रपूर (देवरिया) गावातली.

जेव्हा सहा वर्षांच्या मुलाला उगवलं शेपूट...

Last Updated: Wednesday, April 16, 2014, 08:15

उत्तर प्रदेशात एका सहा वर्षांच्या मुलाला सध्या देवत्व बहाल केलं गेलंय... आजुबाजुचे लोक इतकंच काय तर कुटुंबीयही देव समजून त्याची पूजा करतात... त्याचं कारण म्हणजे या मुलाला उगवलेलं शेपूट...

इथं उन्नावचा खजिना नाही... पण तरीही सर्व काही सोन्यासाठी!

Last Updated: Sunday, April 6, 2014, 15:58

उत्तरप्रदेशताली उन्नावमध्ये सोन्याचा शोध घेण्यासाठी राबवलेली मोहिम आपण पाहिली. सोनं मिळविण्याचीही लालसा फक्त भारतातच नाही तर परदेशांमध्येही दिसून येते. गनजॉर्गो देशातील मॉगटेडो शहरापासून जवळपास १० किलोमीटर अंतरावर असलेल्या नॉबसिन गावामध्ये सोन्याच्या खाणी आहेत. लालसेपोटी हे सोनं शोधण्यासाठी इथल्या गावांमधली मुलं बेकायदेशीरपणे सुरंग खोदून सोनं शोधण्याचं काम करतायेत.

नरेंद्र मोदी `कुत्र्याच्या पिल्लाचा मोठा भाऊ`...

Last Updated: Wednesday, April 2, 2014, 15:38

भाजपच्या पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आता सगळ्याच पक्षांच्या निशाण्यावर आलेत. समाजवादी पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि उत्तरप्रदेशमधील शहर विकास मंत्री आझम खान यांनीही यात हात धुवून घेतलेत. मोदींवर टीका करताना त्यांना आपली सीमारेषाही ओलांडलीय.

'चिल्लर पार्टी' नव्हे ही तर 'थिल्लर पार्टी'!

Last Updated: Wednesday, February 19, 2014, 15:52

`लोकशाही` या शब्दाला लाजवेल अशा घटना सध्या संसदेत आणि विधानसभेसारख्या ठिकाणी घडताना दिसत आहेत. नुकतंच लोकसभेत खासदारांनी `मिरची स्प्रे कांड` घडवून आणलं होतं... त्यानंतर आज पुन्हा एकदा `उघडबंब` नेत्यांनी संसदीय परंपरा धुळीला मिळवल्याचं दिसून आलं.

मुंबई संघात अर्जुन तेंडुलकरसोबत चहावाल्याच्या मुलाची निवड!

Last Updated: Tuesday, January 7, 2014, 19:52

उत्तरप्रदेशच्या सुल्तानपूर जिल्ह्यात चहाचं लहानसं दुकान चालवणार्या! राजकुमार शर्मा यांचा १३ वर्षीय मुलगा हृतिक शर्मा याची निवड मुंबईच्या १४ वर्षांखालील क्रिकट संघात करण्यात आली आहे.

मुजफ्फरनगर पुन्हा पेटलं; मारहाणीत चार जणांचा मृत्यू

Last Updated: Thursday, October 31, 2013, 10:56

मुजफ्फरनगर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झालाय. जिल्ह्यातील बुढाना भागात बुधवारी रात्री पुन्हा एकदा सांप्रदायिक हिंसेची घटना घडलीय.

स्वप्न सोन्याचं : २५०० टन सोन्यासाठी सशस्त्र टोळीकडून उत्खनन!

Last Updated: Sunday, October 20, 2013, 09:51

उत्तर प्रदेशच्या उन्नाव जिल्ह्यात कथित सोन्याच्या खजिन्याचा शोध सुरू असतानाच बाबा शोभन सरकारला पुन्हा पडलं स्वप्न पडलंय. उन्नावसह फतेपूर आणि कानपूरमधील चार जागीं सोनं असल्याचं त्यांनी सरकारला सांगितलंय. त्यामुळं काही अज्ञात आणि सशस्त्र लोकांनी परिसरात खोदकाम केल्याचं कळतंय.

आम्लेटमध्ये कांदा नाही म्हणून झाडली गोळी!

Last Updated: Tuesday, September 24, 2013, 15:21

उत्तरप्रदेशात गुंडाराज किती फोफावलंय याचं नुकतंच एक उदाहरण समोर आलंय. केवळ, ऑम्लेटमध्ये कांदा घातला नाही म्हणून एका गुंडानं विक्रेत्यावर गोळी झाडलीय.

काँग्रेसनं मुझफ्फरनगर दंगलीचा संबंध जोडला मोदींसोबत

Last Updated: Monday, September 9, 2013, 18:26

जातीय दंगलीचा फटका बसलेल्या मुझफ्फरनगरमधील परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्यात समाजवादी पक्षाच्या सरकारला अपयश आल्याची टीका देशभरातून होत असतानाच, काँग्रेसनं मात्र या घटनेचा संबंध गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी जोडण्याचा प्रयत्न केला.

बिग बींची फसवणूक, दोन लाखांची मदत घेऊन मुलींची आई बेपत्ता

Last Updated: Monday, September 9, 2013, 12:39

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी पाटण्यातील दोन मुलींना दोन लाख रूपयांची मदत केली होती. मात्र त्या मुलींची आई ते दोन लाख रूपये घेऊन बेपत्ता झाल्याने बिग बी यांची मदत वाया गेली आहे.

उत्तरप्रदेशात सापडला नैसर्गिक वायूचा मोठा साठा!

Last Updated: Thursday, September 5, 2013, 10:39

‘ऑईल अॅन्ड नॅच्युरल गॅस कमिशन’ च्या (ओएनजीसी) देहरादून फ्रंटियर बेसिन टीमनं उत्तरप्रदेशस्थित मऊ जिल्ह्यात नैसर्गिक वायूचा खजानाच शोधून काढलाय.

आठ वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार; शेतात दिलं फेकून

Last Updated: Tuesday, September 3, 2013, 10:57

एका आठ वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करून तिला शेतात फेकून दिल्याची धक्कादायक घटना उत्तरप्रदेशात उघडकीस आलीय. रात्रभर अंधारात निर्जन ठिकाणी ही चिमुरडी आक्रंदन करत पडली होती.

बलात्कार करुन जिवंत जाळले

Last Updated: Friday, July 12, 2013, 16:14

उत्तरप्रदेशातील इटावामधील केसरमऊ गावात बुधवारी एका महाविद्यालयीन मुलीवर सामुहिक बलात्कार करुन तिला जिवंत जाळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या क्रुर घटनेनंतर शुक्रवारी सकाळी रुग्णालयातच उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

रॉकेलनं भरलेल्या मालगाडीला आग; लाखोंचं नुकसान

Last Updated: Friday, December 7, 2012, 16:44

उत्तरप्रदेशात रॉकेलचे टँकर्स घेऊन जाणाऱ्या मालगाडीला लागलेल्या भीषण आगीत १६ डबे जळून खाक झालेत. पहाटे तीनच्या सुमारास गाडीचं इंजिन आणि चार डबे रुळावरून घसरले. त्यामुळे गाडीनं पेट घेतला.

'महिलांनी मोबाईलवर बोलायचं नाही...'

Last Updated: Friday, July 13, 2012, 13:09

पश्चिम उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील एका खाप पंचायतीनं एक तुघलकी फर्मानच काढलंय. वयोवर्षं ४० पर्यंतच्या कोणत्याही महिलांनी आणि तरुणींनी बाजारात जायचं नाही तसंच त्यांनी मोबाईलवरही बोलू नये, असा आदेश या खाप पंचायतीनं दिलाय.

देशातली पहिली नाईट सफारी उत्तरप्रदेशात

Last Updated: Wednesday, May 30, 2012, 14:24

जंगलातून फिरायचंय तेही रात्री... ही संधी आता भारतातही उपलब्ध होणार आहे. कुठे माहित आहे... उत्तरप्रदेशात.

जो राखे 'उत्तरप्रदेश'... ओ राखे 'भारत देश'..

Last Updated: Tuesday, March 6, 2012, 00:14

समाजवादी पक्षाच्या मुलायमसिंग यादव यानीही यावेळेला सत्ता आणायचीच याच हेतूने प्रचारयंत्रणा राबवली. स्टार प्रचारक म्हणुन अखिलेश यादव यांच्या रॅली सभानी समाजवादी पक्षाला पुन्हा संजीवनी लाभलीय.

ईदमुळे उत्तरप्रदेश निवडणूक मतदान पुढं

Last Updated: Sunday, January 8, 2012, 23:16

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात ४ फेब्रुवारीला होणारं मतदान पुढं ढकलण्यात आलं आहे. निवडणूक आयोगानं हा निर्णय घेतला आहे. ४ फेब्रुवारीला मतदान होणार होतं.