Last Updated: Monday, June 16, 2014, 15:52
www.24taas.com, झी मीडिया, बंगळुरू कर्नाटकच्या गुरुवायुरच्या श्रीकृष्णा महाविद्यालयाच्या ‘कॅम्पस’ मॅगझिनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल टीकात्मक वक्तव्य केल्याच्या आरोपाखाली नऊ विद्यार्थ्यांना अटक करण्यात आलीय.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना जामीन मंजूर करण्यात आलाय. यामध्ये ‘कॅम्पस’ मॅगझिनच्या संपादक, उपसंपादक आणि संपादकीय सल्लागार समितीच्या सदस्यांचा समावेश आहे. त्यांच्यावर कलम १५३ नुसार भारतीय दंड संहितेच्या वेगवेगळे आरोप लावण्यात आलेत.
‘कॅम्पस’ मॅगझिनमध्ये या विद्यार्थ्यांनी मोदींविरुद्ध अशोभनीय भाषेचा वापर केल्यानं, पोलिसांनी या विद्यार्थ्यांविरुद्ध प्रकरण दाखल केलं होतं. हे महाविद्यालय चालविणाऱ्या गुरुवायुर श्रीकृष्णा मंदिर समितीनं याप्रकरणात प्राचार्यांकडून स्पष्टीकरण मागितलंय.
याप्रकरचं हे दुसरं प्रकरण आहे. यापूर्वी एका पॉलिटेक्निक कॉलेजच्या कॅम्पस मॅगझिनमध्ये मोदींचा फोटो अॅडॉल्फ हिटलर, ओसामा बिन लादेन, जॉर्ज बुश यांच्यासोबत नकारात्मक पद्धतीनं दाखवण्यात आला होता. या पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या प्राचार्य आणि काही विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला होता.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, June 16, 2014, 15:52